घरदेश-विदेशजाणून घ्या, जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान नेमकी आहे तरी कोण?

जाणून घ्या, जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान नेमकी आहे तरी कोण?

Subscribe

वयाच्या २७ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या सनाने अवघ्या सात वर्षात मोठा राजकीय पल्ला गाठला

जगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान बनण्याचा मान फिनलँडच्या माजी मंत्री सना मरीन यांना मिळाला आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्या या देशाच्या पंतप्रधान झाल्याने जगभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. माजी परिवहन असलेल्या सना मरीन या फिनलँडच्या राजकारणात सक्रीय असून इथल्या सोशल डेम्रोकेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी त्यांची निवड केली. त्यामुळे त्या केवळ या देशाच्याच नव्हे तर जगाच्या राजकीय इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. वयाच्या २७ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या सनाने अवघ्या सात वर्षात मोठा राजकीय पल्ला पार केला आहे.

- Advertisement -

 

सना मरिन यांची ओळख

  • १६ नोव्हेंबर १९८५ रोजी सना मरिन यांचा जन्म झाला असून २०१२ मध्ये टॅम्पियर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली.
  • पदवी घेतल्यानंतर राजकारणात त्या सक्रिय झाल्या. २०१५ मध्ये सना प्रथमच संसदेच्या सदस्य झाल्या.
  • संसदेच्या सदस्य झाल्यानंतर सिटी काऊन्सिलमध्ये २०१७ साली त्यांची निवड झाली. परिवहन आणि दूरसंचार मंत्रालय सांभाळवल्यानंतर २०१९ मध्ये पहिल्यांदाच सरकारमध्ये सहभागी झाल्या आहेत.

- Advertisement -

समलैंगिक पालकांकडून संगोपन

लवकरच सना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर सेंटर-लेफ्ट आघाडीचे नेतृत्व मरिन यांच्याकडे असणार आहे. तसेच इतर पाच पक्षांसोबत हे सरकार चालवावे लागणार आहे. सना मरिन यांचे लग्न झाले असून त्यांना एक लहान मुलगी देखील आहे. सना त्याच्या व्यक्तिमत्वाचे संपुर्ण श्रेय आपल्या पालकांनाच देतात. विशेष म्हणजे त्यांचे पालनपोषण आणि संगोपन समलैंगिक पालकांनी केल्याचे सांगितले आहे.

मरिन यांच्यानंतर हे आहेत तरूण पंतप्रधान

३४ वर्षाच्या सना मरीन सध्या जगातल्या सर्वात तरूण पंतप्रधान असल्या तरी मरिन यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारूक यांचा नंबर लागतो. ओलेक्सी ३५ वर्षांचे आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंगही ३५ वर्षांचे आहेत. तर न्युझीलँडच्या पंतप्रधान जैकिंडा आर्डेन या ३९ वर्षांच्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -