घरदेश-विदेशभगवान जगन्नाथ यात्रेला अमित शहांची उपस्थिती

भगवान जगन्नाथ यात्रेला अमित शहांची उपस्थिती

Subscribe

अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ च्या १४१ रथ रात्रेला प्रारंभ झाला असून आज सकाळी भाजप अध्यक्ष अमित शाहांनी दर्शन घेऊन आरती केली. अमित शाहांबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाली आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनीही दर्शन घेतले. परंपरेनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी झाडू मारला. पूरी येथील यात्रेला काही वेळातच सुरुवात होणार असून दिल्ली येथे दुपारी या यात्रेला सुरुवात होणार आहे. या वर्षाच्या यात्रेत १५ लाख लोक सामील होणार आहेत. सकाळी ७ वाजता अहमदाबाद येथे यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणच्या लोकांनी हजेरी लावली. दरवर्षी भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यातीघांची यात्रा काढल्या जाते. यात्रेत प्रत्येकवर्षी २,५०० साधु सहभागी होतात. या रथ यात्रेचा १.५ कोटींचा विमा काढण्यात आला आहे. त्यामुळे जर रथयात्रे दरम्यान चेंगराचेंगरीत कोणाला आपला जीव गमवावा लागला त्याला आर्थिक मदत केली जाते.

- Advertisement -

यात्रे दरम्यान दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना ३० हजार किलो ओली मुग,५०० किलो गुलबजाम, ३०० किलो आंब्याचा रस आणि ४०० किलो काकडी दिली जाईल. यात्रेच्या सुरुवातीला १८ हत्ती, १०१ ट्रक, ३० लोक कला सादर करणारे लोक आहेत. याच बरोबर १८ भजन मंडळी आणि तीन वाजंत्री वाले असणार आहे. रथयात्रेची शेवट संध्याकाळी ७ वाजता मंदिरमध्ये परत आणून केला जाईल.

पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

पंतप्रधान मोंदीनी या यात्रेसाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ म्हणजे गरिबांचे देवता आहे. इंग्रजीत असलेल्या जगरनॉट चा अर्थ म्हणजे कोणीही न थांबवू शकणारा असा होतो. म्हणून देवाची कृपा ही न थांबवू शकण्यासारखी आहे. देवाचे आर्शीवाद गरिबांवर, शेतकऱ्यांना मिळो आणि यावर्षीही चांगला पाऊस हो असे त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

लाईव्ह दर्शनासाठी बघा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -