घरट्रेंडिंगइन्स्टाग्राम सेन्सेशन ट्विंकल कपूर

इन्स्टाग्राम सेन्सेशन ट्विंकल कपूर

Subscribe

ट्विकंल कपूर या नावाने इन्स्टाग्रामवर पॉप्युलर असलेली मॉडेल ही मराठी मुलगी असल्याचे फार कमी लोकांना माहीत आहे. फोटोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची जाहीरात करण्यासाठी तिने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलचा चांगला वापर केला आहे.

सोशल मीडियावर सर्वात जास्त लोकप्रिय असलेली नेटवर्किंग साईट म्हणजे इन्स्टाग्राम. इथे फेसबुकसारखे लंबेचौडे स्टेटस चालत नाहीत. ट्विटरसारखं २८० कॅरेक्टरची ब्रेकिंगही चालत नाही. इथे फक्त पाहिले जातात फोटो आणि व्हिडिओ… ते म्हणतात ना “A picture is worth a thousand words” इन्स्टा त्यातलाच काहीसा प्रकार. भारतातही मोठ्या प्रमाणावर इस्टा युजर्स वाढतायत. खासकरुन तरुण पिढी आज इन्स्टावर आहे. इन्स्टा हे फोटोच्या माध्यमातून पैसे कमवून देण्याचे साधन बनले आहे. तुमच्याकडे क्वालिटि फॉलोअर्सची (म्हणजेच एखाद्या उत्पादनाचा संभाव्य ग्राहक) संख्या असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहीराती करु शकता. इन्स्टाग्रामवर ट्विकंल कपूर डॉल हे अकाऊंट चांगलेच फेमस आहे. ही ट्विकंल एक मराठी मुलगी आहे, हे कोणालाच माहीत नाही. मायमहानगरशी बोलताना ट्विकंलने आपली खरी ओळख सांगितली. मराठमोळ्या ट्विकंलला इन्स्टाने आज मॉडेल म्हणून नावारुपास आणलंय. ट्विकंलची वैयक्तिक माहिती जाणून घेण्यापूर्वी तिच्या प्रोफेशनविषयी जाणून घेऊयात.

प्रोफाईल https://www.instagram.com/twinklekapoordollll
खरं नाव – चित्रा विलास कदम
फॉलोअर्स – ६ लाख ६५ हजार
इन्स्टाग्रामची सुरुवात – २०१२
इन्स्टाग्रामवर मार्केटिंग – २०१६ पासून

ट्विकंलने पाच वर्षांपूर्वी इन्स्टाचे अकाऊंट उघडले होते. शून्य फॉलोअर्सपासून सुरु झालेला हा प्रवास आज ६ लाख ५१ हजार फॉलोअर्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. ट्विकंल अनेक आंतरराष्ट्रीय कपड्याच्या ब्रँडचे प्रमोशन करते. हा तिचा फुल टाईम व्यवसाय झालाय. ट्विकंल सांगते, सुरुवातीला मी स्वतःचे सेल्फी, फोटोशूट पोस्ट करत आपला प्रोफाइल अपडेट केला. हळू हळू फॉलोअर्सची संख्या वाढत गेली.

- Advertisement -

एक-दीड वर्षांपूर्वी ट्विकंलला पहिली जाहिरात मिळाली. त्या दिवसानंतर आजपर्यंत तिने मागे वळून पाहिलेले नाही. हे करताना ट्विकंल आणि तिच्या मॅनेजरने नियोजनबद्धरित्या जाहीरातींचे व्यवस्थापन केलेले आहे. Shein App आणि AMIClubwear हे दोन आंतरराष्ट्रीय ब्रँड ट्विकंलकडे आहेत. इन्स्टाग्रामवर जाहीरात करण्यासाठी या कंपन्या ट्विकंलला त्यांचे नवीन प्रॉडक्ट्स पाठवतात. त्या प्रॉडक्टसहित स्वतःचे काही फोटोज इन्स्टावर पोस्ट करावे लागतात. फोटोसोबत कंपनी व प्रॉडक्टचे कॅप्शन देत ब्रँड अवेरनेस करायचा, असा हा काहीसा जाहीरातीचा प्रकार आहे. कधी कधी प्रॉडक्टच्या डिमांडनुसार फोटोशूटही करावे लागते. आपल्या प्रोफेशनबद्दल बोलताना ट्विंकल सांगते की, आंतरराष्ट्रीय ब्रँड हे खूप प्रोफेशनल आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे सोपं जातं. पैसेही चांगले मिळतात.

- Advertisement -

ट्विंकलचा इन्स्टा प्रोफाईल अजून वेरिफाईड झालेला नाही. त्यामुळे व्यवसायात अनेक अडचणी येत असल्याचे ती सांगते. वेरिफिकेशन नसल्यामुळे अनेकांनी ट्विकंलच्या नावाने फेक अकाऊंट बनवलेले आहेत. काही लोकांनी ट्विकंलच्या प्रसिद्धीचा वापर करत तिचे फोटो मॉर्फ करुन ShoutOut अॅपवर पोस्ट केलेले आहेत. या अॅपवर ट्विकंलचा फोटो वापरून दुसऱ्याच मुलीला टॅग केले जाते, याचा फायदा त्या मुलीच्या प्रोफाईलला फॉलोअर्स मिळवण्यासाठी होतो आणि त्यानंतर ते स्वतः जाहीरात करायला सुरुवात करतात. त्यामुळे वेरिफिकेशनची प्रक्रिया चालू केली असल्याचे तिने सांगितले.

ट्विकंल आज बोल्ड मॉडेलिंग क्षेत्रात आहे. पण तिचा सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. घरातली वडिलधारी मंडळी मॉडेलिंगच्या विरोधात होते. पदवी मिळवल्यानंतर काय करायचे ते कर? असा घरच्यांचा दंडक होता. मात्र मॉडेलींगची आवड स्वस्थ बसून देत नव्हती. ‘त्यामुळे माझ्या आईनेच ट्विकंल कपूर या टोपणनावाने सुरुवात करण्यास सांगितले’, असे ट्विकंल सांगते. मॉडेलिंग क्षेत्रात बोल्ड फोटोशूटही करावं लागतं त्यासाठी घरच्यांचा पाठिंबा नव्हता. पण आईने साथ दिल्यामुळेच हे शक्य झाले. ट्विकंलचे खरे नाव चित्रा कदम आहे. फक्त इंडस्ट्रीसाठी चित्राने ट्विकंल नाव धारण केलेले आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -