घरताज्या घडामोडीबॉलिवूडच्या या हरहुन्नरी अभिनेत्याला ओळखलं का?

बॉलिवूडच्या या हरहुन्नरी अभिनेत्याला ओळखलं का?

Subscribe

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे चित्रपटातील कॅरेक्टरवर त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतात. तर काही हरहुन्नरी अभिनेते नेहमी आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्यांच्या चाहत्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. राजकुमार राव हा देखील आपल्या अभिनयाने नेहमीच सर्वांना आश्चर्यचकित करत असतो. राजकुमार रावने सध्या त्याच्या नव्या चित्रपटातील लुकचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. अनुराग बासूच्या आगामी लुडो चित्रपटात दोन पात्रांची भूमिका राजकुमार वठवत आहे. या दोन्ही भूमिकांचा लुक त्याने इन्स्टावर शेअर केलाय. यातल्या एका लुकमध्ये राजकुमार राव ओळखता देखील येत नाहीये.

राजकुमार रावने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने महिलेचे कपडे घातले असून लाऊड मेकअप केलेला आहे. त्यामुळे त्याला सहजासहजी ओळखता येत नाहीये. लुडो चित्रपटात त्याच्यासोबत अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मलहोत्रा आणि रोहित सराफ देखील काम करत आहे. २४ एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजकुमार रावने आपला लुकची झलक दाखवून चाहत्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. तर दुसऱ्या लुकमध्ये देखील राजकुमार चांगलाच भाव खाऊन जात आहे. मिथुन चक्रवर्तीचा चाहता असल्याप्रमाणे त्याने त्याची ड्रेसिंग केलेली दिसून येत आहे.

- Advertisement -

यावर्षी राजकुमार रावचे आणखी दोन चित्रपट येणार आहेत. हार्दिक मेहताच्या रुही अफ्जा या हॉरर कॉमेडी चित्रपटात तो जान्हवी कपूर सोबत दिसणार आहे. तर छलांग चित्रपटात तो नुसरत भरुचा सोबत दिसणार आहे. वर्ष २०१९ मध्ये राजकुमारचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यामध्ये एक लडकी को देखा तो ऐसा लगा, जजमेंटल है क्या आणि मेड इन चायना या चित्रपटांचा समावेश आहे.

- Advertisement -

२०१० साली राजकुमारने रण या चित्रपटातून एक छोटीशी भूमिक केली होती. तेव्हापासून सुरु झालेला त्याचा प्रवास एका प्रस्थापित अभिनेत्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. मागच्या दहा वर्षात त्याने एकापेक्षा एक असे सिनेमे दिले आहेत. या दहा वर्षात काई पो चे, शाहिद, ट्रॅप्ड, न्यूटन, बरेली की बर्फी असे वेगळ्या धाटणीचे सिनेमे त्याने केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -