घरताज्या घडामोडीतोट्यातील एसटीसाठी वापरणार यूपीचा फॉर्म्यूला

तोट्यातील एसटीसाठी वापरणार यूपीचा फॉर्म्यूला

Subscribe

चार सदस्यीय समिती उत्तर प्रदेशात जाणार असून तेथील एसटीचा अभ्यास करणार आहेत.

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशांच्या इतर राज्यामध्ये सर्वाधिक पुढे आहेत. देशांचे इतर राज्यही महाराष्ट्राच्या विकास प्रारुपाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या राज्यात येतात. मात्र आता चक्क तोट्यात चालणार्‍या एसटी महामंडळावर उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळाच्या फॉर्मूल्यासाठी उत्तर प्रदेशात जाण्याची वेळ आली आहे. राज्यातील एसटी महामंडळातील तोटा कसा कमी करता येईल. यासाठी एसटी महामंडळाचे चार सदस्यीय शिष्टमंडळ उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळाचा अभ्यास करण्यासाठी भेट देणार आहे.

दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या तोटा वाढत जात असल्यामुळे

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतुकीत एसटीचे महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असे एसटीला संबोधले जाते. मात्र सध्या एसटीमध्ये उत्पन्नपेक्षा सेवेसाठी खर्च जास्त होत आहे. तसेच दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या तोटा वाढत जात असल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी आणि एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळानी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती भारतातील सर्वाधिक फायद्यात असलेल्या उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळाचा अभ्यास करणार आहे. त्यानुसार तो अहवाल महामंडळाला देण्यात येणार आहे. तसेच त्या अहवालावर एसटी महामंडळ अंमलबजावणी करणार आहे.

- Advertisement -

लालपरीला फायद्यात आणायचे असले तर…

मात्र या चार सदस्यीय समितीचा उत्तर प्रदेशाच्या दौराचा अभ्यासाचा अंतीम निर्णय होणे बाकी आहे. एसटी नवीन अध्यक्ष आणि मंत्री आले की, त्यांच्या आदेशापुढे अधिकारी वर्गांचे काही चालत नाही. आज एसटीत आलेल्या नवीन प्रकल्पामुळे आणि खासगी वाहतुकदारांमुळे एसटीला सर्वाधिक नुकसान सोसाव लागत आहे. सर्वसामान्याच्या लालपरीला फायद्यात आणायचे असले तर राज्य सरकारने एसटी महामंडळाला शासनाने एक विभाग म्हणून दर्जा देणे गरजेचे आहे.

४ हजार ५४९ कोटींचा एसटीला संचित

२०१४-१५ ला एसटीचा संचित तोटा १ हजार ६८५ कोटींचा असलेला तोटा आता ४ हजार ५४९ कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. २०१७-१८ च्या अखेर एसटीला ३३६८ कोटींचा संचित तोटा होता. बघितले तर आतापर्यंत सर्वाधिक तोटा हा फक्त माजी परिवहण मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात झाला आहे. इतकेच नव्हे तर मार्च २०१८ ते मार्च २०१९ या आर्थिक वर्षात एसटीला ९६५ कोटी तोटा झाला आहे.

- Advertisement -

वर्ष             उत्पन्न                          खर्च                 नफा, तोटा     संचित तोटा

२०१४-१५      प्रत्यक्ष                     ७२५८.३५ कोटी       ७९००.२७       १६८५.३४
२०१५-१६      प्रत्यक्ष                     ७२८४.४८ कोटी       ७४६७.२३       १८०७.२२
२०१६-१७      प्रत्यक्ष                     ७०५६.३३ कोटी       ७५९९.९०        २३३०
२०१७-१८      प्रत्यक्ष                     ७१६८.१ कोटी         ८१९६.२७        ३६६३.२१
२०१८-१९      सुधारित अंदाज           ८११९.३८ कोटी       ८९९८.७५        ४५४९.७०
२०१९-२०      अर्थसंकल्पीय अंदाज    ९१८३.३ कोटी         ९८२८.५६        ५१९२.२३


हेही वाचा – एसी लोकलच्या बाहेर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -