घरताज्या घडामोडी'मलंग'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; दिशाच्या लूकवर चाहते फिदा

‘मलंग’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; दिशाच्या लूकवर चाहते फिदा

Subscribe

'मलंग' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आगामी चित्रपट ‘मलंग’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटातील मुख्य पात्रचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. अभिनेता अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल केमू आणि अभिनेत्री दिशा पटानी या चित्रपटात मुख्य भूमिकेतून दिसणार आहे. ‘मलंग’ या चित्रपटातील सर्वाचा लूक पाहून चाहते स्तब्ध झाले आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केल्यानंतर अभिनेता आदित्य रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर शेअर करताना त्याने असं लिहिलं की, ‘प्रेम जितकं शुद्ध असतं तितकचं तिरस्कारात्मक असतं.’

- Advertisement -

आदित्य रॉयने शेअरने केलेल्या पोस्टरमध्ये तो ओरडताना आणि अॅब्स दाखवताना दिसत आहे. आदित्यच्या या लूकवर अभिषेक बच्चनने ‘फॅब्युलस’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनिल कपूरच्या पोस्टरमध्ये हातात बंदूक घेऊन तो दिसत आहे. त्यामुळे तो खलनायकाची भूमिका साकारत असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

अनिल कपूरच्या लूकचा पोस्टर शेअर करताना असं लिहिलं की, ‘आयुष्य हे ईश्वराच्या हातात असतं आणि माझ्या हातात बंदूक.’ याव्यतिरिक्त दिशा पटानीचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर चांगलाचं चर्चेत आला आहे. तसंच सध्या ट्विटवर देखील या लूकमुळे ती ट्रेंडिंग मध्ये आहे.

तसंच ‘मलंग’ या चित्रपटातील कुणाल केमू लूक देखील प्रदर्शित झाला आहे. त्याने या चित्रपटातील लूक इन्स्टाग्राम शेअर केला असून मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘कमाल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरी याने केलं आहे. ‘मलंग’ हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – बिपाशाने ‘या’ व्यक्तीसोबत केले नवीन वर्षाचे स्वागत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -