घरताज्या घडामोडीदिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान

Subscribe

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या ८ फ्रेबुवारीला दिल्लीत मतदान पार पडणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या ८ फ्रेबुवारीला दिल्लीत मतदान पार पडणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तसेच आजपासून आचारसहिंता लागू झाल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर निवडणुकीत १३ हजार ७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीत राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? आणि दुसरे म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्याचा निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार आहे.

येत्या २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मुदत संपणार आहे. तर दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तसेच यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत होणार आहे. तर आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहे. परंतु, भाजपने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

हे आहेत महत्त्वाचे मुद्दे

– दिल्लीत आजपासून आचारसंहित लागू.
– २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
– निवडणुकीसाठी १४ जानेवारी रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल.
– उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवारी अंतिम तारीख.
– ८ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
– ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
– APP च्या माध्यमातून आचारसंहितेचं उल्लंघन केलेल्या तक्रारींची नोंद घेतली जाईल.
– निवडणुकीत १,४६,९२,१३६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
– निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ९० हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे.
– २ हजार ६८९ जागांवर एकूण १३ हजार ७५० मतदान केंद्र असणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जालना : जिल्हा अध्यक्षपदी ‘महाविकास’ आघाडीचे वानखेडे यांची बिनविरोध निवड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -