घरमनोरंजनअभिनेत्रीने कार विकून घेतली रिक्षा, नेटिझन्सने दिल्या 'या' प्रतिक्रीया!

अभिनेत्रीने कार विकून घेतली रिक्षा, नेटिझन्सने दिल्या ‘या’ प्रतिक्रीया!

Subscribe

प्रत्येकाच आपल्याकडे एखादी महागडी गाडी असावी असं स्वप्न असतं. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून विकत घेण्याची क्रेझ सेलेब्रेटींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पण टिव्हीजगतातल्या अभिनेत्रीने चक्क आपली महागडी कार विकून ऑटोरिक्षा विकत घेतली आहे. ‘रंग बदलती ओढनी’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री यशश्री मसूरकर हिने आपली कार विकून ऑटोरिक्षा विकत घेतली आहे. आता मालिकेच्या सेटवर यशश्री ऑटोरिक्षा घेऊन जाते.

- Advertisement -

यशश्री म्हणते, रिक्षामुळे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी वाचतात. माझ्याकडे जेव्हा कार होती, तेव्हा ड्रायव्हरसाठी वेगळे पैसे द्यावे लागत होते. ड्रायव्हर कधी येऊ शकला नाही तर काम अडून राहायचं. कमी खर्चीक गोष्टींमध्ये माझ्या गरजा पुर्ण होत असतील तर लोक काय म्हणतील याचा विचार मी करत नाही.

- Advertisement -

माझे आई-बाबा जुन्या विचारसरणीचे आहेत. त्यांचं मन राखणं सोपं नव्हतं. मी स्वत: त्यांना एकदा ऑटोरिक्षामधून फिरवून आणलं आणि समजावलं की यात काहीच वाईट नाही.”

ऑटोरिक्षा विकत घेतल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रीयांविषयी यशश्री म्हणते, अभिनेत्रीला ऑटोरिक्षा चालवताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. महिला रिक्षा चालवते म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
माझ्या सहकलाकारांनीही मला नावं ठेवली. मात्र मी माझ्या निर्णयाशी ठाम होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -