घरताज्या घडामोडीTik Tok ला मिळणार आता टक्कर, Google नेही लाँच केले Tangi App

Tik Tok ला मिळणार आता टक्कर, Google नेही लाँच केले Tangi App

Subscribe

गूगलने एक नवीन अॅप लाँच केले आहे. Tangi अस या अॅपचं नाव आहे. यामुळे आता टिकटॉकला टक्कर मिळणार आहे.

सध्या टिकटॉकचे मोठ्याप्रमााणावर युजर्स आहेत. तरुणांमध्ये तर टिक टॉक व्हिडिओ बनवण्याचे ट्रेंड सुरू आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे व्हिडिओ यात बनवले जातात. अशातच गूगलने फेसबुक आणि नंतर टिक टॉकची लोकप्रियता पाहता एक नवीन App लाँच केले आहे. Tangi असं या Appचं नाव आहे. Tangi म्हणजे Teach and Give.

काय आहे या App मध्ये वेगळे 

तसेच हे App टिकटॉकपेक्षा वेगळे आहे. कारण Tangi App वर वापरकर्ते बर्‍याच विषयांवर 60 सेकंदाचे व्हिडिओ बनवू शकतात. संकेतस्थळाला भेट दिल्यावर Appबद्दल सर्व माहिती मिळते. त्यामध्ये आपण आपल्याला हवे असलेले पर्याय निवडू शकतो. तसेच हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता यामध्ये 60 सेकंदांच्या व्हिडिओंचे ट्यूटोरियल सुद्धा बनवू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या नव्या विषयांवर आपण माहितीपर व्हिडिओ तयार करू शकतो. जसे की मेकअप, चविष्ट पदार्थ, वेगवेगळ्या कला. हे अ‍ॅप लोकप्रिय vine App च्या सह-संस्थापकांनी तयार केले आहे. परंतु सध्या हे App गुगल स्टोअरवर दिसत नाही. मात्र लवकरच ते आपल्याला वापरायला मिळणार आहे.

- Advertisement -

या नव्या Appचे वेगळेपण पाहता टिकटॉकला टक्कर मिळेल का? App च्या युजर्सचे प्रमाण कमी होईल का असे एक ना अनेक प्रश्न पडतात..

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -