घरताज्या घडामोडीमाजी महापौरांच्या बंगल्याला भीषण आग

माजी महापौरांच्या बंगल्याला भीषण आग

Subscribe

मुंब्रा किस्मत कॉलोनी परिसरात राहणारे माजी महापौर नाईम खान यांच्या बंगल्याला अचानक आग लागली असून त्यांच्या घरातील सामान जळून खाक झाले आहे.

मुंब्रा किस्मत कॉलोनी परिसरात राहणारे माजी महापौर नाईम खान यांच्या बंगल्याला आज अचानक पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये त्यांच्या हॉलमध्ये असलेले घरगुती सामान जाळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती माजी महापौर नईम खान यांनी दिली आहे.

- Advertisement -

घरगुती सामान जाळून खाक

किस्मत कॉलोनी मुंब्रा परिसरात मेराज मंझिल हा माजी महापौर नईम खान आहे. याच बंगल्याच्या तळमजल्यावर असलेल्या ठिकाणी अल रफिक फास्ट फूड नावाचे दुकान आहे. या दुकानात अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. यात आगीत फास्टफूडचे दुकान जळून खाक गेले आहे. त्यामुळे नईम खान यांच्या बंगल्यातील हॉलमध्ये आगीने जोर धरला. आगीवर नियंत्रण मिळण्यापूर्वीच हॉलमधील एलईडी टीव्ही, एसी, सोफासेट आणि फर्निचर जाळून खाक झाले. आगीने भीषण स्वरूप धारण केले. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आटोक्यात आली. या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – मलबार हिल परिसरात सिलिंडर स्फोटामुळे आग


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -