घरदेश-विदेशशाहीनबागेत गोळ्या झाडणारा बैसल मोदी-शहांचा समर्थक; वडिलांचा दावा

शाहीनबागेत गोळ्या झाडणारा बैसल मोदी-शहांचा समर्थक; वडिलांचा दावा

Subscribe

दिल्लीच्या शाहीनबाग परिसरामद्ये आंदोलकांना धमकावून गोळी चालवणारा कपिल बैसल आपशी संबंधित नसून अमित शाह-नरेंद्र मोदींना मानणारा होता, असा खुलासा त्याच्या वडिलांनी केला आहे.

दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या महिलांवर दमदाटी करून हवेत गोळीबार करणारा कपिल बैसल हा आम आदमी पक्षाचा सदस्य होता असा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला होता. मात्र, ‘आपल्या मुलाचा आम आदमी पार्टीशी काहीही संबंध नाही, माझाही आपशी काहीही संबंध नाही, उलट माझा मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा समर्थक होता’, असा खळबळजनक दावा कपिल बैसलचे वडील गजे सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत विरोधकांच्या आक्रमक दाव्यांमधली हवाच निघून गेली आहे.

‘तो नेहमी हिंदुत्वावर बोलायचा’

‘आम्ही आजपर्यंत आपचं सदस्यत्व घेतलेलं नाही. माझ्या मुलाला राजकारणाशी देणं घेणं नाही. कपिल मोदींचा आणि अमित शहांचा समर्थक होता. आंदोलनामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम असायचं. त्यामुळे त्याला कामावर जायला उशीर व्हायचा. पण तो पूर्णवेळ हिंदुत्व आणि हिंदुस्थानविषयी बोलायचा’, असा दावा कपिल बैसलच्या वडिलांनी केला आहे.

- Advertisement -

आपनं घेतली होती निवडणूक आयोगाकडे धाव

गोळीबार करणारा कपिल बैसल आम आदमी पक्षाच्या एका कार्यक्रमात दिसत असल्याचं दाखवणारा एक फोटो व्हायरल होऊ लागला होता. या फोटोवरून कपिल बैसल आम आदमी पक्षाचा सदस्य होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, निवडणूक काळात निवडणूक आयुक्तांच्या ताब्यात कारभार असताना त्यांना न विचारला कोणत्या पक्षाचं नाव पोलीस आयुक्तांनी कसं घेतलं? असं म्हणत आपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर कारवाई करत निवडणूक आयोगाने राजेश देव यांच्याकडची निवडणुकीसंदर्भातली सर्व जबाबदारी काढून घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -