घरताज्या घडामोडीदिल्लीत दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदानाची नोंद...

दिल्लीत दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदानाची नोंद…

Subscribe

दिल्लीत दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे.

दिल्लीत जोरदार प्रचारानंतर आज अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्लीतील एकून ७० विधानसभा मतदारसंघांमधून ६७२ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -

दिल्लीतील जवळ-जवळ १ कोटीपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टी, भाजपा, काँग्रेस या पक्षातील सर्वदूर चर्चित सामना प्रचारामध्ये रंगला असला; तरीही आप आणि भाजपमध्ये अधिक चढाओढ दिसली. भाजपच्या मंत्र्यांनी शाहीनबागचा मुद्दा प्रचारता उचलला होता तर आप ने मागच्या पाच वर्षात केल्या कामांवर जोर धरल्याचे यावेळेस दिसून आले. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला केवळ ३ जगांवर समाधान मानावे लागले होते.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा, मुलगा केहान यांच्यासह दिल्लीतील लोधी रोड केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच भाजप जेष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी देखील औरंगजेब लेन येथील मतदार केंद्रावर मतदान केले. मात्र दिल्लीत दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त तीस टक्के मतदान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -