घरताज्या घडामोडीइतकी लाचार शिवसेना कधी पाहिली नाही - फडणवीस

इतकी लाचार शिवसेना कधी पाहिली नाही – फडणवीस

Subscribe

सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून विधानसभेमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरीवर बंदीची मागणी केली. मात्र, ती मागणी सरकारने मान्य न करता फेटाळून लावली. तसेच, सावरकरांच्या गौरव प्रस्तावाची मागणी देखील अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावली.

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी असून त्यांच्या गौरवाचा प्रस्तान सरकारकडून मांडला जावा, अशी मागणी या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विधानसभेत करण्यात आली होती. या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मात्र, सरकारकडू भाजपवरच उलट प्रतिहल्ला करून हा प्रस्ताव अखेर मांडण्यात आलाच नाही. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘इतकी लाचार शिवसेना मी आजपर्यंतच्या आयुष्यात बघितलेली नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून सरकारला लक्ष्य केलं. ‘आम्ही कलम २३ अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला होता. मी स्वत: त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. पण दुर्दैवाने सरकार तो प्रस्ताव मांडण्यात असमर्थ ठरलं. सगळ्यात वाईट बाब म्हणजे काँग्रेसचं मुखपत्र असेल्या शिदोरीमध्ये सावरकरांबद्दल निंदनीय आणि खोटा मजकूर छापला. त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत की त्यावर बंदी घातली जावी. पण दुर्दैवाने मी आजच्याऐवढी लाचार शिवसेना आयुष्यात पाहिली नाही. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या बॅनरला जोडे मारले होते. पण, त्यांचेच पुत्र आता शिदोरीवर बंदी घालायला तयार नाहीत’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भाजपनेच प्रस्ताव मंजूर केला!

दरम्यान, याचा निषेध म्हणून भाजपनेच अभिरूप विधानसभा भरवत हा प्रस्ताव मंजूर केला. यासंदर्भात फडणवीसांनी पत्रकारांना सांगितलं. ‘किमान सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडायला हवा होता. तो प्रस्ताव मांडायला देखील ते तयार नाहीत. त्यासाठीच आम्ही अभिरूप विधानसभा तयार केली. त्यामध्ये शिदोरी मासिकावर बंदी आणि सावरकरांचा गौरव प्रस्ताव आम्ही मंजूर केला. मात्र, आजचा दिवस इतिहास विसरणार नाही की सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली होती. आता हा प्रश्न आम्ही जनतेपर्यंत नेणार आहोत’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसजी, बांगड्यांच्या वक्तव्यावर माफी मागा-आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीसांचं हेच ते वादग्रस्त वक्तव्य | Devendra Fadnavis Controversial Statement

देवेंद्र फडणवीसांचं हेच ते वादग्रस्त वक्तव्य | Devendra Fadnavis Controversial Statement

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 26, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -