घरताज्या घडामोडीदिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात - अजित डोवाल

दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात – अजित डोवाल

Subscribe

दिल्लीच्या सुरक्षेची सूत्रे आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हाती देण्यात आली आहेत. आज डोवाल यांनी हिंसाचार झालेल्या भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उत्तर-पूर्व दिल्लीचा भाग असणाऱ्या मौजपूरमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. दिल्लीच्या सुरक्षेची सूत्रे आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हाती देण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे याबद्दलची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत.

- Advertisement -

अजित डोवाल यांनी स्वत: तिथे जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला. “मनात प्रेमाची भावना ठेवा, आपला देश एक आहे,” असे नागरीकांशी संवाद साधताना ते म्हणाले. “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. लोक समाधानी आहेत. सुरक्षा यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे. पोलीस त्यांचे काम करत आहेत,” असे डोवाल म्हणाले.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: परिस्थिती हाताबाहेर जातेय, कर्फ्यू लावा – अरविंद केजरीवाल

डोवालांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी

दिल्लीतील हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत दाखल झाले होते. मंगळवारी मध्यरात्री डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -