बुरखा परिधान करुन ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; चोराने बुरखा काढला आणि…

प्रभादेवी येथे दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालणाऱ्या आरोपीला दादर पोलिसांनी अटक केली आहे.

One crore 14 lakh robbery in Sudhagad taluka
सुधागड तालुक्यात एक कोटी १४ लाखांचा दरोडा

प्रभादेवी येथे दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रभादेवी येथील स्वर्णदीप ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगलसिंग देवडा (४०) असे आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात दादर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बुरखा परिधान करुन प्रभादेवीमधील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

बुरखा परिधान करुन प्रभादेवीमधील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 26, 2020

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रभादेवी येथील स्वर्णदीप ज्वेलर्सच्या दुकानात रविवारी एक महिला आपले नाव शर्मा शेट्टी असून मला सोने खरेदी करायचे आहे, असे तिने सांगितले. त्याप्रमाणे ऑर्डर लिहून घ्या मंगळवारी पैसे आणून देते, असे सांगत ऑर्डर लिहून घेण्यास जबरदस्ती केली. त्यानुसार, दुकानात काम करणारा कर्मचारी चंपा सिंग यांनी त्या व्यक्तीची ऑर्डर लिहून घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी ही महिला मंगळवारी पुन्हा ४ वाजण्याच्या सुमारास बुरखा घालून आली. त्या दरम्यान, त्या व्यक्तीसोबत अजून एक व्यक्ती आली होती. ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांनी पैसे आणले का अशी विचारणा केली. त्यावेळी ‘मी पैसे आणले आहेत. मला बांगडीचे सँम्पल दाखवा’, असे सांगू लागली. त्याप्रमाणे कर्मचारी सँम्पल आणण्यासाठी कारागिराकडे गेला असता. आरोपींनी दुकानात असलेल्या एका कर्मचाऱ्याला पिस्तुल दाखवत दुकान रिकामी करण्याची मागणी केली. हा प्रकार भरदिवसा झाल्यामुळे नागरिकांना आरडाओरड ऐकू आला. मात्र, आपण पकडले जाऊ असे समजताच आरोपींनी जमावाला बंदूक दाखवत त्याठिकाणहून पळ काढला. मात्र, त्या आरोपीला जमावाने पकडले आणि त्याचा बुरखा काढला. त्यादरम्यान हा चोर दुसरा तिसरा कोणी नसून दुकानातील १५ वर्षाचा कर्मचारी असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दादर पोलिसांनी मंगलसिंग देवडा या आरोपीसह महिलेला अटक केली आहे, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी दिली आहे.

१५ वर्षे काम करणारा कर्मचारी

हा आरोपी स्वर्णदीप ज्वेलर्सच्या दुकानात गेली १५ वर्षे काम करत होता. मात्र, या आरोपीला गेले ३ वर्षाचा पगार न मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – आता सगळ्या शाळांना मराठी भाषा ‘कम्पल्सरी’! विधेयक मंजूर!