घरताज्या घडामोडी'आईला जीव लाव...,' चिठ्टी लिहून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

‘आईला जीव लाव…,’ चिठ्टी लिहून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Subscribe

दुष्काळामुळे शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही. यामुळे वाघ यांचे मानसिक स्वास्थ खालावले होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दोन याद्या जाहीर केल्या. मात्र, या यादीत आपले नाव न आल्याने जालना जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने आतेमहत्या केली आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड (बुद्रुक) येथील गजानन पुंजाजी वाघ (३६) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वत: च्या चिमुरड्या मुलीच्या नावे चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत “आईला जीव लाव. मी देवा घरी चाललो,” असे चिठ्ठीच्या माध्यमातून लेकीला सांगत या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. या घटनेने वरुड गाव शोकाकुल झाले आहे.


हेही वाचा – चंदा कोचर यांची मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

गजानन वाघ हे अल्पभूधारक शेतकरी होते. वाघ पंधरा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण परिवाराचा भार त्यांच्यावर खांद्यावर आला. गजानन वाघ यांच्यावर महिंद्रा
फायनान्स कंपनीचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते तर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख इतके कर्ज होते. मात्र, दुष्काळामुळे शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही. यामुळे वाघ यांचे मानसिक स्वास्थ खालावले होते. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्या. मात्र, या याद्यांमध्ये आपले नाव न आल्याने वाघ हताश झाले. कर्ज फेडायचे कसे यामुळे अस्वस्थ असलेल्या वाघ यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

- Advertisement -

काय लिहिलं होतं चिठ्ठीमध्ये?

“माझ्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे मी जगण्यास असमर्थ आहे. या कर्जबाजारीपणामुळे मला जगण्याचा कंटाला आला आहे. तुमच्या गरजा, आईचे स्वप्न मी पूर्ण करु शकत नाही. यामुळे मी खचलो आहे. आता आईला जीव लाव, मी देवा घरी चाललो,” अशी चिठ्ठी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलीला लिहिली. आवाज देऊनही कोणी दार उघडत नसल्यामुळे आजी व मुलगी घराजवळ आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला, त्यावेळी घरात गजानन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती तत्काळ भोकरदन पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -