घरताज्या घडामोडीमुंबईतल्या ब्लॅक स्पॉटवर २०३ लोकांचा मृत्यू

मुंबईतल्या ब्लॅक स्पॉटवर २०३ लोकांचा मृत्यू

Subscribe

ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.

मुंबईतील अपघाती मृत्यूमध्ये घट होत असली तरी मुंबईतील ५८ ब्लॅक स्पॉटवर मागच्या तीन वर्षात २०३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तराला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी यासंबंधी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.


हेही वाचा – धक्कादायक: राज्यात रोज ३० मुलांचे अपहरण त्यात ७२ टक्के मुली

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तरात सांगितले की, मुंबईतील ५८ ब्लॅक स्पॉटवर तीन वर्षात ९०३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये एकूण २०३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच या ब्लॅक स्पॉटवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी गरजेनुसार वाहतूक अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच या स्पॉटवर काही पादचारी रस्ता ओलांडत असल्यामुळे अपघात घडतात. ते टाळण्यासाठी स्कायवॉकचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी पेट्रोलींग, वाहतूक सुरक्षा पंधरवडा असे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -