घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या वतीनं राम मंदिराच्या निर्मितीसाठी १ कोटींचा निधी

शिवसेनेच्या वतीनं राम मंदिराच्या निर्मितीसाठी १ कोटींचा निधी

Subscribe

आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यानच मुख्यमंत्री यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं राम मंदिर निर्मितीसाठी १ कोटींचा निधी घोषित केला. पत्रकारांशी संवाद साधतना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अयोध्येला येणं हे माझं भाग्य आहे. मी अयोध्येला तिसऱ्यांदा आलो आहोत. मी नोव्हेंबर मध्ये अयोध्येला आलो होतो आणि नोव्हेंबर मध्येच मुख्यमंत्री झाले. मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की मी मुख्यमंत्री होईन.’

- Advertisement -

‘शरयू नदीच्या आरतीसाठी मी पुन्हा येईन’

पुढे ते म्हणाले की, ‘माझी शरयू नदीची आरती करण्याची खूप इच्छा होती. मात्र भारतात करोना व्हायरस पसरल्यामुळे शरयू नदीची आरती करू शकत नाही. पण मी शरयू नदीची आरती करण्यासाठी पुन्हा येईल.’ ‘मला कालच कळालं ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे मी राम मंदिर निर्मितीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देत आहे. हा निधी सरकारच्या वतीनं नसून शिवसेनेच्या वतीनं देण्यात येत आहे. या निधीचा ट्रस्ट स्विकार करावा’, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारू

‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्ताची राहण्याची सोय व्हावी म्हणून इथं जागा उपलब्ध करून द्यावी. तिथं आम्ही महाराष्ट्र भवन उभारू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हिंदुत्व आणि भाजप वेगळं

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले की, ‘मी भाजपपासून वेगळा झालो आहे. हिंदुत्वापासून वेगळा झालो नाही. हिंदुत्व आणि भाजप वेगळं आहे.’


हेही वाचा – Video: ठाकरे सरकारचा कामकाज सांगणारा खास व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -