घरताज्या घडामोडीअमृता फडणवीस ट्रोल का होतात? राज्यमंत्री अदिती तटकरेंनी सांगितले कारण

अमृता फडणवीस ट्रोल का होतात? राज्यमंत्री अदिती तटकरेंनी सांगितले कारण

Subscribe

अमृता फडणवीस यांचं मत ज्यांना पटतं ते लाईक करतात आणि ज्यांना अधिक पटत नाही ते ट्रोल करतात, अदिती तटकरे म्हणाल्या.

अमृता फडणवीस यांची मते ज्यांना आवडतात ते लाईक करतात तर ज्यांना पटत नाहीत ते ट्रोल करतात असे मत राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिला सुरक्षितता हा देशाला आणि राज्याला भेडसावणारा प्रश्न असल्याचे देखील नमूद केले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर अनेकदा ट्रोल केले जाते. असा प्रश्न राज्यमंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ट्रोलिंग हा प्रकार काही नवीन नाही. वैयक्तिक स्वातंत्र्य असल्याने आपण मत मांडू शकतो मग तो राजकारणी असू दे की सामाजिक क्षेत्रातील. राजकीय परिस्थितीनुसार आपली मते मांडली जातात. त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांनी आपले मत मांडले आहे. ज्यांना पटते ते लाईक करतात आणि ज्यांना अधिक पटत नाही ते ट्रोल करतात. जस मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तस ट्रोल करण्याचा ही फॉलोअर्स ना अधिकार असतो असे अदिती म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सीएएविरोधी आंदोलनामागे आयसीसचा हात? दोघांना अटक

पुढे त्या म्हणाल्या की, महिला सुरक्षितता हा राज्याला आणि देशाला भेडसावणारा प्रश्न आहे. यावर जागरूक होणे गरजेचे आहे. दिशा कायदा लागू होत असताना अधिक कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून दुसऱ्या राज्यातील गृहमंत्री यांना इथे येण्याची वेळ येईल, असे त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, पुरुषांची जी महिलांप्रति बघण्याची पद्धत आहे किंवा मानसिकता आहे यात सुधार होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात महिला सुरक्षेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले आहे असे ही त्या म्हणाल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -