घरताज्या घडामोडीकरोनामुळे आता रोटेशन पद्धतीने बाजारपेठा राहणार बंद!

करोनामुळे आता रोटेशन पद्धतीने बाजारपेठा राहणार बंद!

Subscribe

मुंबईतल्या बाजारपेठांसाठी रोटेशन पद्धतीने बंद ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला असून कोणत्या बाजारपेठा कधी बंद राहणार, याची यादी बनवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.

राज्यात होणाऱ्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आज काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये राज्यातील बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्या यांच्यासाठी काही नवे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामध्ये बाजारपेठांसाठी दिलेल्या निर्देशांनुसार, रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून-पालटून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात ही प्रक्रिया कशी असावी? कोणते मार्केट कधी बंद असावे? हे ठरवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासन किंवा पालिकांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने काम सुरू केले असून रस्त्यांनुसार दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्देशांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं आयुक्तांनी पाठवलेल्या निर्देश पत्रामध्ये नमूद केलं आहे.

कोणती दुकानं राहणार बंद?

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १९ मार्च म्हणजेच उद्यापासून केली जाणार आहे. त्या संदर्भात मुंबईचे महानगर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी शहरातल्या सर्व २४ वॉर्डमधील विभागीय सहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले आहेत. आपापल्या विभागामध्ये वर्दळ होणाऱ्या किंवा मार्केट भरणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करून त्यामध्ये कोणत्या रस्त्यावरील दुकानं कधी बंद ठेवता येतील? याचं नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ही यादी तयार करून त्यानुसार रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून पालटून रस्त्यांवर भरणारं मार्केट आणि दुकानं बंद ठेवण्याची कार्यवाही सुरू करावी, असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

bmc commissioners orders

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार…

करोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दुपारी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार, खासगी क्षेत्रातील कंपन्यांना कार्यालयात ५० टक्के कर्मचारीच हजर ठेवता येणार असून रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून पालटून सुट्टी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, बसमध्ये उभ्याने प्रवास बंद करून बसून देखील एक सीट सोडून बसावं लागणार आहे.


हेही वाचा – करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -