घरCORONA UPDATECoronavirus : करोनाबाधितांची चाचणी १४ दिवसांनंतर निगेटिव्ह

Coronavirus : करोनाबाधितांची चाचणी १४ दिवसांनंतर निगेटिव्ह

Subscribe

दोन करोनाबाधित रुग्णांची चाचणी केल्यानंतर १४ दिवसांनी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

करोनाबाधितांवर मुंबईच्या कस्तुरबा आणि पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आतापर्यंत अनेकांवर या दोन रुग्णालयात उपचार सुरु असून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन करोनाबाधित रुग्णांना १४ दिवस विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज त्यांची चाचणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या रुग्णांना उद्या घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

पुन्हा केली जाणार करोनाची चाचणी

पुण्याच्या नायडू रुग्णालयात ९ मार्च रोजी या दोन्ही संशयितांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णांची चाचणी केली असता ते करोनाबाधित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले गेले असून या दोघांचे विलगिकरण कक्षातील आज १४ दिवस पूर्ण झाले. त्यानंतर या दोन्ही करोनाबाधित रुग्णांची तपासणी केली गेली. या तपासणीमध्ये त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, उद्या त्यांना घरी पाठवताना त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाणार असून त्यांची जर चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांना काही सूचना देण्यात येतील आणि मगच त्यांना घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुटखाबंदी, पानटपर्‍या बंद, तरीही पिचकार्‍या मारणारे अबाधित!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -