घरCORONA UPDATECoronavirus: पंजाबमध्ये ९० हजार NRI करोना संशयित

Coronavirus: पंजाबमध्ये ९० हजार NRI करोना संशयित

Subscribe

या संकटाचा सामना करण्यासाठी पंजाब सरकारने केंद्र सरकारकडे १५० कोटींचा निधी मागितला आहे.

देशात करोनाने हातपाय पसरले आहेत. देशात करोनाचे ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. असे असताना पंजाबमधऊन धक्कादायक माहिती समोर आली आहे, पंजाबमध्ये ९० हजार NRI आले आहेत, अशी माहिती पंजाबचे आरोग्यमंत्री बलवीर सिद्धू यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून दिली. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी १५० कोटींचा निधी मागितला आहे.


हेही वाचा – Breaking: अखेर शिवराजसिंह चौहान पु्न्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले

- Advertisement -

मार्च महिन्यात पंजाबमध्ये ९० हजार आले आहेत. यामधील अनेक NRI आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने लपून बसले आहेत. या सर्वांमध्ये करोनाची लक्षणे असू शकतात, असा अंदाज पंजाब राज्य सरकारने व्यक्त केला आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतस मागितली आहे. केंद्र सरकारने पंजाबमध्ये डॉक्टर, व्हेंटीलेटर आणि इतर आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी पंजाब सरकारने केली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये आतापर्यंत २३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. सध्या देशात करोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहेत. तर महाराष्ट्र सध्या तीसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. यामुळे राज्यात संचारबंदी, जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -