घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: आता दोन दिवसांत नाही तर अडीच तासांत करोनाचे कळणार रिपोर्ट!

CoronaVirus: आता दोन दिवसांत नाही तर अडीच तासांत करोनाचे कळणार रिपोर्ट!

Subscribe

जगभरात करोना व्हायरस आणि त्यांच्यातून होणारा कोविड १९ या आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या करोना चाचणीचा अहवाल येणारा वेळ कमी करण्यासाठी करोनाची तपासणीकरिता चाचणी किट तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर दोन दिवस किंवा त्याहून अधिक वेळ अहवाल येण्याकरिता लागत आहे. मात्र आता हा अहवाल येण्याकरिता दोन दिवस नाही तर फक्त अडीच लागणार आहे, असा दावा एका जर्मनी कंपनीने केला आहे. त्यांनी तयार केलेल्या चाचणी किटद्वारे करोनाचा अहवाल फक्त अडीच तासांत कळणार आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, गुरुवारी रॉबर्ट बॉश जीएमबीएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी वोल्कमार डेनर यांनी एका निवेदनात असा दावा केला. ते म्हणाले की, त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या चाचणी किटमधून अडीच तासपेक्षा कमी वेळात करोना तपासणीचा अहवाल येतो. यामुळे महामारीशी युद्ध करण्यास याची मदत होईल. तसंच करोना संशयित रुग्णांची वेगाने ओळख होईल आणि त्यामुळे त्यांना लवकर आयासोलेट केले जाऊ शकेल.

- Advertisement -

तसंच अहवालानुसार बॉश पुढे म्हणाले की, या नवीन चाचणी किटमध्ये आरोग्य विभागाने डिझाइवे केलेले वाइवालिटिक मॉलीक्यूलर डायगनॉस्टिक्स प्लेटफॉर्मचा वापर केला आहे. फ्लू आणि न्यूमोनियासारख्या अनेक जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांची ओळख तपासण्यासाठी हे उपकरण पूर्वीपासून रुग्णालये, प्रयोगशाळा आणि वैद्यकीय सरावमध्ये वापरले जात आहे. हे उपकरण एप्रिलमध्ये जर्मनीत उपलब्ध होईल आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जाईल.

उत्तर आयरलॅंडचे वैद्यकीय उपकरणे निर्माते रैन्डॉक्स लैबोरटरीज लिमिटेच्या यांच्या सहकार्याने हे चाचणी किट तयार केलं असल्याचं बॉश यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: स्पेनमध्ये करोनाचा कहर; २४ तासांमध्ये ७१८ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -