घरताज्या घडामोडीमजुरांवर लॉकडाऊनचा घाला, ४ जणांचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

मजुरांवर लॉकडाऊनचा घाला, ४ जणांचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

Subscribe
संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्याण्यात आल्यामुळे सुट्टीत आप आपल्या घरी जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन झाल्याने संपूर्ण वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठप्प झाली आहे. त्यामुळे या घटनेतील मजूरांनी आपल्या घरच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला होता. गुजरात कंदील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना एका भरधाव वर्गाने येणाऱ्या आयसार टेम्पोने यांना जोरदार धडक दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचार बंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही.  जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -