घरCORONA UPDATEलक्षणं दिसत नसली तरीही मास्क घालणं आवश्यक आहे का?

लक्षणं दिसत नसली तरीही मास्क घालणं आवश्यक आहे का?

Subscribe

‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन’ या संस्थेने ३ एप्रिलपासून मास्क घालण्याबाबतच्या प्राथमिक मार्गदर्शक सूचना बदलल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वात सामान्य प्रश्न विचारला जातो की, लक्षणं नसतानाही आपल्याला मास्क घालायला पाहिजे का? प्राथमिक मार्गदर्शक सूचनांनुसार उत्तर नाही आहे. अमेरिकेतील सामान्य लोकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सर्वात महत्वाची संस्था ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) च्या प्रारंभिक मार्गदर्शक सूचनांनुसार मास्क फक्त आजारी असलेल्यांनीच घातलं पाहिजे किंवा ते आजारी असलेल्या एखाद्याची काळजी घेत असतील त्यावेळी वापरलं पाहिजे. मात्र, ३ एप्रिलपासून सीडीसीने मास्क घालण्याबाबतच्या प्राथमिक मार्गदर्शक सूचना बदलल्या आहेत. २५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे मास्कच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे.


हेही वाचा – खूशखबर: चीनमध्ये १४ जणांवर कोरोना लसीची यशस्वी चाचणी

- Advertisement -

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू केवळ श्वासोच्छवासाने पसरतो असा दावा केल्यानंतर अमेरिकन सरकारने लोकांना बाहेर जाताना मास्क घालायचा सल्ला दिला. अमेरिकेत प्रत्येकासाठी मास्क घालणं अनिवार्य झालं आहे. तथापि, हे मास्क नॉन-मेडिकल असू शकतात जे घरी करणे शक्य आहे.

इतर देशांची स्थिती

जगाच्या इतर भागातील सरकारांनी या प्रश्नाला सुरुवातीपासूनच वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, जर तुम्ही कोरोना विषाणूचा आजार असलेल्या ठिकाणी असाल तर तुम्ही मास्क घालायलाच पाहिजे. सध्या चीनच्या मार्गदर्शकतत्त्वे त्यांच्या आरोग्यासंबंधीचे जोखीम आणि व्यवसाय यावर अवलंबून सामान्य लोकांसाठी विविध प्रकारचे फेस मास्कची शिफारस करतात. दुसरीकडे, सीडीसीने शिफारस केली आहे की अमेरिकन लोक एकतर ऑनलाइन खरेदी केलेले किंवा घरी बनविलेले साधे कापडांचे मास्क घालू शकतात.

- Advertisement -

मास्क घालण्याचा दृष्टीकोन कसा बदलला

वास्तविक, अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार कोविड -१९ विषाणू शिंकेतून ६-८ मीटर पर्यंत जाऊ शकतो. आपण बोलत असल्यास किंवा अगदी श्वास घेत असाल तर हा विषाणूचं निरोगी व्यक्तीस संक्रमण होऊ शकतं. कारण अलीकडील संशोधनात असं म्हटलं आहे की जवळजवळ २५ टक्के रुग्ण ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे परंतु कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. चीनने सुरुवातीला हे लपविण्याचा प्रयत्न केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -