घरCORONA UPDATEकोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरले आरोग्यसेतू मोबाईल अॅप!

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरले आरोग्यसेतू मोबाईल अॅप!

Subscribe

सध्या बहुतेक भारतीय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. मात्र, यामुळे आपल्याला कोरोना होण्याची किती शक्यता आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोनाची पूर्ण माहिती देण्यासाठी आरोग्य सेतू नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केलं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वापरकर्त्याला कोरोनाविषयीची पूर्ण माहिती मिळू शकणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला कोरोना होण्याची किती शक्यता आहे? याचा अंदाज देखील या मोबाईल अॅप्लिकेशनच्या मदतीने तुम्हाला येणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने देखील हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं आहे.

काय आहे या अॅप्लिकेशनमध्ये?

- Advertisement -

हिंदी, मराठी, इंग्रजी या तीन भाषांसह एकूण ११ भारतीय भाषांमध्ये हे मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध असून अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलवर ते डाऊनलोड करता येणार आहे. या ‘आरोग्य सेतू’ॲपच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे. याबाबत आकलन होणार आहे. त्याशिवाय कोरोना विषाणूचे संक्रमण ओळखणे शक्य होणार आहे. मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल होताच ते जवळच्या अन्य उपकरणांचा शोध घेऊन विविध माहितीचे संकलन करते आणि आवश्यक त्या सूचनेचे प्रसारण करते. ‘आरोग्य सेतू’ॲप कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अॅलर्ट करण्याचेही काम करेल. तसेच हे ॲप युझरच्या ब्लूटूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशनवरून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? या गोष्टी ट्रेस करेल. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहनही भारतीय रेल्वेतर्फे करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा‘आरोग्य सेतू’मोबाईल अॅप डाऊनलोड करूनकोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

देशभरात आत्तापर्यंत ३ हजाराच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातले १८३ जण बरे झाले आहेत, तर ६८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -
इथे डाऊनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -