घरट्रेंडिंगVideo: हवेत गोळीबार करणाऱ्या भाजप महिला नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल

Video: हवेत गोळीबार करणाऱ्या भाजप महिला नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल

Subscribe

भाजपच्या नेत्या मंजू तिवारी यांनी रविवारी ९ मिनिटे दिवे पेटवण्याऐवजी हवेत गोळीबार केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरस झाला.

देशभरात कोरोना व्हायरस फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ एप्रिल शुक्रवारी देशवासियांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिट घरातल्या लाईट बंद करून दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटे लावा, असं देशवासियांना आवाहन केले होते. रविवारी संपूर्ण देशवासियांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला साथ दिली. मात्र यादरम्यान उत्तर प्रदेश मधील बलरामपूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या मंजू तिवारी यांनी हवेत गोळीबार केला. मंजू तिवारी यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आणि त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या.

☺️☺️

मंजू तिवारी बलरामपुर जिले के बीजेपी जिला अध्यक्ष ने Corona Virus को कल रात गोली मार दी,??

Ashok Mandawat ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 5, 2020

- Advertisement -

आता भाजप नेत्या मंजू तिवारी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २८६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. असे वृत्त समोर आल्यानंतर भाजप नेत्या मंजू तिवारी यांनी माफी मागितली आहे. एएनआयशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी संपूर्ण शहर मेणबत्या आणि मातीच्या दिव्याने प्रकाशित झालेले पाहिले. दिवाळी असल्यासारखे वाटले. मी माझ्या हातून झालेली चूक मान्य करते आणि दिलगिरी व्यक्त करते.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला द क्विंटशी बोलताना म्हणाले, जिल्हाध्यक्षांकडून याबाबत अहवाल मागविला गेला असून पक्षाने घेतलेला निर्णय लवकरच कळविला जाईल. मंजू तिवारी यांचा हा व्हिडिओ व्हायरस झाल्यानंतर काही तासांनंतर महिला जिल्हाध्यक्षपद सोडून दिले. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे अध्यक्षा दर्शना सिंह यांनी प्रसिद्ध पत्रकाच्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोना लढाई; अमेरिकेचे भारताला २९ लाख डॉलर अनुदान!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -