घरताज्या घडामोडीरनिंगला गेलेल्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

रनिंगला गेलेल्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Subscribe

नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथे सकाळी रनिंगला गेलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेत ठार केले. ही घटना रविवारी (दि. १९) पहाटे साडेपाच वाचता हिंगणवेढे ते गंगापाडळी गावाच्या रस्त्यावर घडली. कुणाल योगेश पगारे(११) असे मृताचे नाव आहे.  बिबट्याच्या दहशतीमुळे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलीस पाटील दयाजी शिंदे यांनी दिलेली माहिती अशी, हिंगणवेढे गावातील कुणाल योगेश पगारे हा चुलत भाऊ सुरज पगारे, आतेभाऊ गोकुळ लोखंडे, अमरदीप लोखंडे रविवारी (दि. १९) पहाटे साडे पाच वाचता हिंगणवेढे ते गंगापाडळी गावाच्या रस्त्यावर रनिंगला नेहमीप्रमाणे गेले होते. ते गंगापाडळी शिवारात आले असता रस्त्याच्या शेजारील उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलांवर हल्ला केला. कुणाल पगारे याला बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेत ठार केले. या प्रकाराने तीनही मुले घाबरली होती. त्यांनी आरडाओरडा करत एक किलोमीटर अंतर धावत घरी आल्यावर घटनेची माहिती कुटूंबियांना दिली. पोलीस पाटील दयाजी शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे व वनविभागाच्या अधिका-यांना पाचारण केले. सरपंच सुमन धात्रक, वाल्मिक धात्रक, पांडुरंग गिते, सकाळी सहा वाजेपासून गावातील शेकडो लोकांनी उसाच्या शेताला घेराव करत कुणालचा शोध घेतला उसाच्या शेतात पन्नास फुट आत त्याचा मृतदेह आढळुन आला. कुणालच्या मानेला, हाताला व पायाला गंभीर जखमा आढळुन आल्या. पोलीस पाटील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात माहिती दिली असता हवालदार अर्जुन गांगुर्डे, व कर्मचारी यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -