घरताज्या घडामोडीपॉझिटिव्ह महिला प्रसूतीनंतर कोरोना निगेटिव्ह होऊन बाळासह घरी रवाना

पॉझिटिव्ह महिला प्रसूतीनंतर कोरोना निगेटिव्ह होऊन बाळासह घरी रवाना

Subscribe

घणसोली येथील कोरोना पाॅझिटिव्ह महिला प्रसूतीनंतर कोरोना निगेटिव्ह होऊन रूग्णालयातून बाळासह सुखरूप घरी रवाना झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर १०, वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड १९ रुग्णालयामध्ये ६ एप्रिल रोजी घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेची अत्यंत सुव्यवस्थितरित्या सिझेरीन प्रसूती करण्यात आली. या महिलेच्या हृदयाविषयी गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये अत्यंत सुरक्षित रितीने ही प्रसूती पार पाडणार्‍या महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपूर्ण राज्यभरात आणि देशात कौतुक करण्यात आले आहे. सुदैवाची बाब म्हणजे सदर महिलेच्या बाळास कोरोनाची लागण झाली नसल्याचे दोनवेळा केलेल्या तपासणीत सिद्ध झाले आहे.

प्रसूती झालेल्या महिलेच्याही दोनवेळा तपासण्या करण्यात आल्या असून अहवाल निगेटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या महिलेस वाशी रूग्णालयातून बाळासह घरी पाठवताना टाळ्यांच्या गजरात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. त्यावेळी या महिलेसह रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले. कोरोना विरोधातील लढाई मनाशी जिद्द बाळगली तर आपण निश्चित जिंकू शकतो. हे त्या महिलेने दाखवून दिले आहेच, शिवाय तिच्या नवजात बाळानेही पृथ्वीतलावर अवतरताना आपल्यातील वेगळेपणाचा प्रत्यय दाखवून दिला आहे, जो अनेकांची प्रेरणा ठरेल.

- Advertisement -

हेही वाचा – ऊसतोड कामगारांना घेऊन एसटी मराठवाड्याकडे रवाना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -