घरCORONA UPDATEदिलासादायक: पुण्यातील ९२ वर्षीय आजीने कोरोनाला हरवलं

दिलासादायक: पुण्यातील ९२ वर्षीय आजीने कोरोनाला हरवलं

Subscribe

९२ वर्षीय महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये ९२ वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे. ९२ वर्षीय महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे या महिलेला अर्धांगवायू होता. सात महिन्यापूर्वी तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशा परिस्थितीत तिने कोरोनाला हरवलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या कुटुंबातील इतर चार जणांना देखील कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांना पुण्यातील सिम्बिओसिस युनिवर्सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. “९२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेसह तिच्या कुटुंबातील ४ जणांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ९२ वर्षीय आजीने कोरोनावर मात केल्यामुळे समाजामध्ये एक चांगला संदेश जाऊ शकतो की, ९२ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली तर ६० वर्षांचा रुग्ण देखील बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही,” असं रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – लोक घरी राहिले तर, उपासमारीने मरतील – अर्थतज्ज्ञ मार्टिन वोल्फ


आईसह कुटुंबातील ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यावर आम्हाला सर्वांना मोठा धक्काच बसला. माझ्या मुलाला देखील कोरोना झाला असून त्याच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, असं कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या ५५ वर्षीय मुलाने सांगितलं. यासह त्यांनी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -