घरताज्या घडामोडीCoronaVirus: बोटांना सूज किंवा जळजळ होणे कोरोनाची नवीन लक्षणे!

CoronaVirus: बोटांना सूज किंवा जळजळ होणे कोरोनाची नवीन लक्षणे!

Subscribe

सर्दी, खोकला, ताप येणे ही कोरोनाची लक्षणे असल्याचे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मात्र आता कोरोनाची नवीन लक्षणे समोर आले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, युरोप आणि अमेरिकेतील त्वचारोगतज्ज्ञ सध्या कोरोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासाठी एका नवीन लक्षणांविषयी चर्चा करीत आहे. विशेषत: ही लक्षणे लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये दिसत असल्याचे समोर आले आहे. मार्चमध्ये इटलीतील काही कोरोनाबाधित रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज तसंच जळजळ होत असल्याचे त्वचारोगतज्ञांना दिसून आले. अशी स्थिती जास्त थंडीत असलेल्या लोकांची असते. तिथल्या लोकांच्या पायाच्या बोटांमध्ये जळजळ होते आणि बोटांना सूज येते असल्याचे समोर आले आहे.

या लक्षणाला ‘कोविड टोज’ असे नाव देण्यात आले आहे. इटलीमधील सर्वात जास्त कोरोनाबाधित भागात ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. त्वचारोगतज्ज्ञांना कोविड-१९च्या रुग्णांमध्ये असे प्रकार होताना आढळून आले. हे फक्त इटलीमध्ये नसून अमेरिकेत देखील आहे. अमेरिकेतील बोस्टनमध्येही ‘कोविड टोज’चे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

- Advertisement -

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मटोलॉजीशी संबंधित डॉक्टर ‘कोविड टोज’ असलेल्या मुलांची आता कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये इटलीमधील मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. यामुळे त्वचारोगतज्ज्ञ आणि मेडिकल प्रोफेशनल यांच्या अनेक वाद झाले.

‘कोविड टोज’ सारखे प्रकार हे जास्त थंडीत असलेल्या लोकांना होत आहेत. आपल्याकडे पावसाळ्यात अशाच प्रकारे बोटांना सूज आणि जळजळ होते. कारण आपण त्यावेळी जास्त पाण्यात असतो.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरली कोरोना ऑटो!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -