घरCORONA UPDATEकोरोनाबाधित रुग्णाची ५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

कोरोनाबाधित रुग्णाची ५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे.

देशात कोरोना विषाणूने विळखा अधिकच घट्ट केला आहे. दररोज झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच या विषाणूवर आतापर्यंत कोणतेही औषध नसल्यामुळे अनेकांच्या मनात या विषाणूची भीती निर्माण झाली आहे. तर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर आपण बरे होणारच नाही असे, त्या व्यक्तीला वाटते आणि ती व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे.

- Advertisement -

बेंगळुरू शहरातील दक्षिण विभागाच्या पोलीस आयुक्त डॉ. रोहिणी कटोच सेपट यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटकच्या बेंगळुरू येथील व्हिक्टोरिया रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील कोरोना संशयिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या रुग्णाचे लाळेचे नमुने तपासणी करता देण्यात आले होते. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच या रुग्णांनी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने या रुग्णाचे प्राण वाचले असून केवळ त्याच्या पायाला फॅक्चर झाले आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूची लक्षणे तात्काळ कळत नाहीत. त्यामुळे त्यावर उपचार करण्यास उशीर होतो. तसेच कोरोनावर अद्याप औषध नसल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे कळताच ती व्यक्ती घाबरुन आत्महत्येचा प्रयत्न करते.  – रणदीप गुलेरिया; दिल्ली एम्सचे संचालक


हेही वाचा – Coronavirus: भारतात १७ हुन अधिक देशांतून कोरोनाचा शिरकाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -