घरमुंबईलोकलखाली प्रवासी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

लोकलखाली प्रवासी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

लोकलखाली प्रवासी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेवर परिणाम झाल्याने प्रवाशांना नाहक‌ त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ठाण्यात ट्रॅक ओलांडताना प्रवासी लोकलखाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ही घटना घडली. सकाळी ७.१५ च्या दरम्यान ही घटना घडली. घटनेत प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने आहे.

या घटनेचा परिणाम सीएस एमटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर झाला आहे. तर, डाऊन मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेवर परिणाम झाल्याने प्रवाशांना मात्र नाहक‌ त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -