घरCORONA UPDATECorona Live Update: पुण्यात एकाच दिवसात २९१ नवे रुग्ण; १४ जणांचा मृत्यू

Corona Live Update: पुण्यात एकाच दिवसात २९१ नवे रुग्ण; १४ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात एकाच दिवसात २९१ नवे रुग्ण

पुण्यात आज एका दिवसात सर्वाधिक २९१ रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

ठाण्यात सर्वाधिक १९७ नवीन रूग्ण आढळले  

ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन १९७ रूग्ण आढळून आले. त्यामुळे करोना बाधित रुग्णाची संख्या १७५७ वर पोहचली आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ६३ झाली आहे. उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संझ्या ५८६ असून हे प्रमाण ३८ टक्के आहे. आजपर्यंत होम क्वारटाईन मध्ये ८९७९ इतकी आहे. ठाण्यात करोना बाधित रुग्णाची संख्या तीन आकडी झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

अंबरनाथमध्ये कोरोनाचे ६ नवे रुग्ण 

- Advertisement -

अंबरनाथमध्ये शुक्रवारी कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये बीएमसीच्या ३८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यांसह मुंबईत काम करणाऱ्या ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा आणि एका २८ वर्षीय आरोपीचा समावेश आहे. या आरोपीला बदलापुर कोविड हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित सर्व रुग्णांना सिटी हॉस्पिटल, अंबरनाथ येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत अंबरनाथमध्ये ५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. १६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

द कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामीनेशन (सीआयएससीई) मंडळाकडून शुक्रवारी आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) च्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आयसीएसईची परीक्षा २ ते १२ जुलै तर आयएससीची परीक्षा १ ते १४ जुलैदरम्यान होणार आहे.


एसटीतून होणार मालवाहतूक; बळीराजाला मिळणार दिलासा

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा माल देखील बाजारात पोहचत नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता सुद्धा वाढली आहे. या संबंधित दैनिक ‘आपलं महानगरनं’ प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आता एसटी महामंडळाने बळी राजाला वाचविण्यासाठी एसटीतून मालवाहतूक सुरु केली आहे. ही मालवाहतूक एसटीच्या प्रवासी बसमधून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा माल थेट गावातून चक्क शहरातील बाजारपेठेत एसटी मार्फत दाखल होणार आहे. पहिल्या टप्यात एसटीच्या १०० गाड्या मालवाहतुकीसाठी तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष Adv अनिल परब यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


नाशकात शुक्रवारी रात्री ११ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.२२) रात्री ८ वाजता १२ रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. बाधित रुग्णांमध्ये ११ जण नाशिक शहरातील आहे. तर, एकजण मालेगाव शहरातील आहेत. आता नाशिक शहरात ६७ रुग्ण बाधित असून जिल्ह्यात एकूण ९०३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)


ग्लोव्हज, एन – ९५ च्या किमतीवर येणार नियंत्रण

कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना योद्ध्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वच सध्या एन – ९५ मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करत आहेत. बाजारामध्ये अचानक मागणी वाढल्याने काळ्या बाजारात विक्री होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने त्याची नोंद अत्यावश्यक सेवेत केली. मात्र तरीही या दोन्ही वस्तू मूळ किमतीपेक्षा चढ्या भावाने विकल्या जात आहेत. त्यामुळे अशा चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा एनपीपीएने दिला आहे. (सविस्तर वाचा)


माटुंगा लेबर कॅम्प बनला धारावीतील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट

अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मुंबईतील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत दिवसेंदिवस बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गुरुवारपर्यंत धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली होती. परंतु यापैकी १२७ रुग्ण हे केवळ माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्ण संख्येच्या ९ ते १० टक्के एवढी संख्या केवळ माटुंगा लेबर कॅम्प या वस्तीतच आढळून आली असून या वस्तींमध्ये बहुतांशी महापालिकेचे सफाई कामगार, महापालिकेचे रुग्णालयीन कामगार, खासगी रुग्णालयांमधील कामगार व कर्मचारी राहत आहे. त्यामुळे अत्यावश्यके सेवेच्या कामगार, कर्मचाऱ्यांची वस्ती असलेला लेबर कॅम्प हा आता धारावीतील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट बनलेला पाहायला मिळत आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईमध्ये कोरोनाचे १७५१ नवे रुग्ण, आज २७ मृत्यू

राज्याप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल १७५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्याही वर जात २७ हजार ६८ इतका झाला आहे. मुंबईत आज एकूण २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ९०९ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनाने अजूनही हातपाय आवरलेले नसल्याचंच दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईत आज दिवसभरात ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ७०८० इतका झाला आहे. (सविस्तर वाचा)


आज राज्यात २९४० कोरोना रुग्णांची नोंद; तर ६३ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून काल सापडलेल्या २३०० रुग्णांवरून आज दिवसभरात राज्यात २९४० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा ४४ हजार ५८२ झाला आहे. याशिवाय आज राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा दीड हजारांच्या पार जात १५१७ इतका झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव अजूनही नियंत्रणात येत नसल्याचं हे चित्र असून लॉकडाऊन उठवल्यानंतर यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २४ तासांत राज्यात ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १२ हजार ५८३ झाला आहे. (सविस्तर वाचा)


होमिओपॅथिक गोळ्यांच्या मदतीने पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार

राज्यात कोरोना संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या  पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातच काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळेच मुंबईसह महाराष्ट्रातील पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांसाठी १ लाख ७० हजार आर्सेनिक आल्बम ३० या होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांच्या वाटपाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम गृह विभागाने आखला आहे. (सविस्तर वाचा)


लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून एसटी महामंडळ आर्थिक संकटा सापडली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्याचा माल बाजारात पोहचत नाही आहे. त्यामुळे  बळीराजाची चिंता सुद्धा वाढली आहे. या संबंधित वृत्त देखील दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आता एसटी महामंडळाने बळी राजाला वाचविण्यासाठी एसटीतून  मालवाहतूक सुरु केली आहे. ही मालवाहतूक एसटीच्या प्रवासी बसेसमधून करण्यात येणार आहे  त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याचा माल  थेट गावातून चक्क शहरातील बाजारपेठे एसटी बसेसमार्फत पोहचविणार आहे. पहिल्या टप्यात एसटीचा १०० गाड्या मालवाहतुकीसाठी तयार करण्यांत येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष Adv अनिल परब यांनी दिली. (सविस्तर वाचा)


पाकिस्तानात १०० प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं

पाकिस्तानात तब्बल १०० प्रवाशांसह विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. धक्कादायक म्हणजे हे विमान रहिवासी भागात एका इमारतीवर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. हे विमान लाहोरवरुन कराचीला जात होतं. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.


कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे राज्य सरकारकडून आता खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा अधिकार राहणार आहे. याकाळात या ८० टक्के बेडवरील रुग्णांकडून किती बिल आकारायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला असेल.


ठाण्यात काल एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यानंतर आज सकाळी त्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याविरोधात ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठाण्याचे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत.

avinash jadhav thane


देशात कोरोनामुळे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ पर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ६०८८ रुग्ण बाधित झाले आहेत. तर काल १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात भारतात वाढलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी पॅकेजच्या घोषणेनंतर आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

 


२९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज आणि चित्रकूटला शेवटचा दौऱ्या केला होता. त्यानंतर ८३ दिवसांनी मोदी दौऱ्यावर जाणार आहेत. अम्फान चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौरा करणार आहेत.


अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनामुळे १,२५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा ९६ हजारहून अधिक आहे. अमेरिकेतील १६ लाखांहून अधिक जणांचा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत ३ लाखांहून अधिक जण रिकव्हर झाले आहे.


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज २ हजाराहून जास्त नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी तीच परिस्थिती राज्यात दिसून आली असून राज्यात २३४५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४१ हजार ६४२ झाला आहे. याशिवाय, गुरुवारी राज्यात ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता १४५४ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ११ हजार ७२६ झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -