घरदेश-विदेशउत्तर कोरियाकडून अण्विक क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरूच!

उत्तर कोरियाकडून अण्विक क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरूच!

Subscribe

उत्तर कोरिया पुन्हा एकदा अण्विक क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा आणि उपग्रहाने मिळवलेल्या फोटोवरून ही बाब आता स्पष्ट झाली आहे.

उत्तर कोरिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हुकूमशहा किम जोंग ऊन! त्याचे पराक्रम आणि अण्विक युद्धाचा धोका! नाही का? अण्विक शस्त्रे नष्ट करण्याचे आश्वासन देणाऱ्या उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र बांधणीला सुरूवात केली आहे. अमेरिका गुप्तचर यंत्रणा आणि उपग्रहांच्या मदतीने घेतलेल्या फोटोवरून ही बाब आता स्पष्ट झाली आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अमेरिकेपर्यंत असणार आहे. सिंगापूरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची जूनमध्ये भेट झाली होती. त्यावेळी अण्विक शस्त्रे नष्ट करण्याचे आश्वासन किम जोंग उन याने ट्रम्प यांना दिले होते. पण, त्यानंतर देखील अण्विक शस्त्रे निर्मितीची प्रक्रिया सुरू ठेवल्याने हुकूमशाहा किम जोंग उनच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर उभे नाही ना? या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात होणार हे नक्की!

जूनमध्ये किम जोंग उन – डोनाल्ड ट्रम्प भेट

अमेरिकेला किंग जोंग उन याने अण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगायला तयार राहा असा धमकी वजा इशारा दिला होता. त्यानंतर ट्विटरवरून देखील या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. दोन्ही देशांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय उत्तर कोरियाने जपानवरून देखील क्षेपणास्त्र डागल्याने हा प्रश्न दिसवसेंदिवस गंभीर होत चालला होता. अखेर दोन्ही देशांनी घेतलेल्या सामंजस्य भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये भेट देखील झाली. यावेळी अण्विक कार्यक्रमक कमी करण्याचे आश्वासन किंम जोंग उन याने डोनाल्ड ट्रम्प यांना दिली. त्यामुळे जगाने देखील सुटकेचा निश्वास टाकला. मात्र आता उत्तर कोरिया क्षेपणास्त्राची बांधणी करत असल्याच्या माहितीमुळे संपूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. किम जोंग उनच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

‘ती’ कृती म्हणजे नौटंकी?

अण्विक कार्यक्रम थांबवण्यासाठी आपण तयार आहोत असे प्रतिपादन उत्तर कोरियाने केले होते. त्यासाठी त्यांनी अण्विक स्थळ नष्ट देखील केले होते. जगभरातील पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये उत्तर कोरियाने ही कृती केली होती. त्यामुळे उत्तर कोरियाची ती कृती केवळ नौटंकी होती का? असा सवाल आता विचारला जात आहे. तसेच ट्म्प यांच्या भेटीपूर्वीची ती एक राजकीय चाल होती? असे देखील आता विचारले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -