घरताज्या घडामोडीWhatsApp द्वारे भारतीय सैन्याची माहिती मिळवण्याचा ISI एजंटचा डाव असा उधळला!

WhatsApp द्वारे भारतीय सैन्याची माहिती मिळवण्याचा ISI एजंटचा डाव असा उधळला!

Subscribe

अबिद हुसैन आणि ताहीर खान हे जानेवारी महिन्यापासून तपास यंत्रणांच्या रडावर होते.

भारतीय तपास यंत्रणेने आयएसआय (ISI) चा डाव उधळून लावला आहे. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती मिळवण्याच आयएसआय चा डाव व्हॉट्सअ‍ॅपमुळे लक्षात आला. आयएसआयच्या या कटामध्ये अबिद हुसैन सहभागी होता. अबिद याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा सल्ला दिला होता. कारण व्हॉट्सअ‍ॅप वापरल्यामुळे आपण तपास यंत्रणेच्या नजरेतून सुटू असा भ्रम अबिदचा झाला. पण याच व्हॉट्सअ‍ॅपमुळे तो पकडला गेला. अबिद हुसैन नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता.

या प्रकरणी पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये असणाऱ्या अबिदने मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीला हेरले होते, तो लष्करी सेवेत काम करतो असा त्याचा समज होता. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरता का? म्हणून अबिदने त्या व्यक्तीकडे विचारणाही केली होती. लष्करात व्हॉट्स अॅ प वापरण्याची परवानगी नाही असे समोरच्या व्यक्तीने सांगितले, तेव्हा अबिदने लपून-छपून व्हॉट्सअॅप वापरला असे सांगितले. आपण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहोत हे अबिद हुसैनला पुसटशी कल्पनाही नव्हती.

अबिद हुसैन आणि ताहीर खान हे जानेवारी महिन्यापासून तपास यंत्रणांच्या रडावर होते. “लष्करातील ज्यूनिअर अधिकाऱ्यांना हेरायचा, त्यांच्याशी मैत्री करायची आणि त्यांच्याकडून सैन्य तुकडयांच्या सीमेवरील हालचालींसदर्भात माहिती मिळवण्याची असा त्यांचा प्रयत्न असायचा” अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. . भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे.


हे ही वाचा – …आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -