घरताज्या घडामोडीपती पत्नीच्या भांडणात ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

पती पत्नीच्या भांडणात ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

Subscribe

या प्रकरणी विरार पोलिसांनी प्रकाश शिंदे या पित्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

पती-पत्नीच्या भांडणात ३ वर्षाच्या चिमुरडीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना बुधवारी रात्री विरार येथील नारंगी बायपास येथे घडली. या प्रकरणी विरार पोलिसांनी पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आढाव यांनी दिली.

ममता (३) असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. या हल्ल्यात ममता आई रंजना गंभीर जखमी असून तीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरार येथील नारंगी बायपास या ठिकाणी राहणारा प्रकाश शिंदे याचा जखमी रंजना सोबत दुसरा विवाह झालेला असून या दाम्पत्याला एक ३ वर्षाची मुलगी ममता ही होती. गेल्या आठवड्यात पती पत्नीत झालेल्या क्षुल्लक वादातून रंजना ही मुलीसह घर सोडून निघून गेली होती.

- Advertisement -

बुधवारी रात्री रंजना मुलीसह घरी आपले सामान घेण्यासाठी आली होती, त्यावेळी दोघात कडाक्याचे भांडण झाले या भांडणातून पती प्रकाशने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नीवर हल्ला केला या हल्ल्यात रंजनाच्या मांडीवर असलेली झोपलेली ३ वर्षाची ममता आणि आई रंजना या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ३ वर्षांची चिमुरडी ममता हिचा मृत्यू झाला असून आई रंजनावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी प्रकाश शिंदे या पित्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पित्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आढाव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -