घरदेश-विदेशखुशखबर! TRAI ने सादर केलं अ‍ॅप; आता ग्राहक निवडू शकणार आपल्या आवडीचे...

खुशखबर! TRAI ने सादर केलं अ‍ॅप; आता ग्राहक निवडू शकणार आपल्या आवडीचे चॅनल

Subscribe

हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि Apple स्टोअरवर उपलब्ध

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज गुरुवारी टीव्ही चॅनेल निवडण्यासाठी मदत व्हावी यासाठी एक अॅप सादर केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांना त्यांच्या आवडीची चॅनेल निवडण्याची सुविधा मिळणार असून त्यांना आवडत नसलेले चॅनेल काढण्याची देखील परवानगी असणार आहे. ट्रायने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारण सेवांसाठी नवीन दर निश्चित केल्यावर हे निदर्शनास आले की, ग्राहकांना त्यांच्या सेवा प्रदात्यांच्या वेब पोर्टल किंवा अ‍ॅप्सवर टीव्ही चॅनेल निवडण्यास किंवा ते काढून टाकण्यास अडचण येत आहे. म्हणूनच ट्रायआयने असे अॅप विकसित करण्याचे ठरविले जे सर्व वितरण प्लॅटफॉर्म ऑपरेटर (टीव्ही चॅनेल सर्व्हिस प्रदात्यांकडून) एकाच ठिकाणी माहिती पुरवू शकेल.

ट्रायने सांगितले की, या अॅपवर डीटीएच सेवा प्रदाता, मल्टी-सिस्टम ऑपरेटरची (एमएसओ / केबल ऑपरेटर) माहिती उपलब्ध आहे. तसेच इतर सेवा प्रदात्यांची माहिती जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नियामक म्हणाले की, टीव्ही वापरकर्त्यांसाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था देण्याच्या उद्देशाने ‘टीव्ही चॅनेल सिलेक्टर अॅप’ विकसित केले गेले आहे.

- Advertisement -

अ‍ॅपवरील सर्व वापरकर्त्यांची ओळख ओटीपी मार्फत केली जाईल. हा ओटीपी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. वापरकर्त्याने आपला नंबर सेवा प्रदात्याकडे नोंदविला नसेल तर हा ओटीपी त्याच्या टीव्ही स्क्रीनवर दिसून येईल. हे अॅप ग्राहकांना निवडलेल्या चॅनेल आणि निवडलेल्या चॅनेलविषयी माहिती प्रदान करण्यास अनुमती देईल. याद्वारे ग्राहक त्यांच्या आवडीचे चॅनेल निवडू शकतात किंवा त्यांना न आवडणारे चॅनेल काढून देखील टाकू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि Apple स्टोअरवर उपलब्ध आहे.


मोफत वायफायच्या नादात बँक अकाऊंट्स होतायत हॅक, आख्खा बॅलन्स सफाचट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -