घरताज्या घडामोडीनाशिक शहरात दुकानांसाठी वेळेचे निर्बंध

नाशिक शहरात दुकानांसाठी वेळेचे निर्बंध

Subscribe

महाराष्ट्र चेंबर्सचा निर्णय : सकाळी १० ते ५ वाजेपर्यंतची वेळ निर्धारित

शहरातील वाढती करोना बाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक शहरातील व्यापारी संघटनांनी एकमताने दुकानांसाठी वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानूसार आता अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने सकाळी १० ते ५ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतल्याचे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

शासनाने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर दुकानांसाठी सम विषम तारखेच्या फार्म्युल्यानूसार दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देतांना दुकानांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या. पूर्वी दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी ९ ते ५ पर्यंतच वेळ देण्यात आली होती मात्र हळूहळू ही वेळ वाढविण्यात येउन सकाळी ५ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच गर्दी उसळली. परिणामी शहरात रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने सम विषम तारखेच्या फार्म्युल्यानूसार दुकाने सुरू न ठेवता दररोज दोन्ही बाजूंकडील दुकाने सुरू ठेवावीत तसेच दुकानांच्या वेळा सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत निश्चित करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.

- Advertisement -

मात्र राज्य शासनाचे धोरण संपूर्ण राज्यासाठी एकच असून जिल्हयासाठी वेगळा निर्णय घेता येणार नाही असे स्पष्ट करतांना व्यापारी संघटनांनी आपापल्या स्तरावर वेळेबाबत निर्णय घेण्याचे भुजबळ यांनी सूचित केले. त्यानूसार महाराष्ट्र चेंबर्सने सर्व व्यापार्‍यांशी चर्चा करून दुकानांच्या वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानूसार आता सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत शहरातील दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची सांगितले. दुकानांसाठी सम विषम तारखेचा लागू केलेल्या नियमाबाबत शासन स्तरावर विचार सुरू असून याबाबत या बैठकीत कोणताही निर्णय होउ शकला नाही त्यामुळे सध्या तरी या निर्देशानूसारच दुकाने सुरू राहतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अत्यावश्यक सेवा बाधित होता कामा नये

लॉकडाउनमुळे लोकांच्या हातात पैसा राहीलेला नाही. लोकांच्या पोटापाण्याचाही विचार सरकारला करावा लागेल त्यामुळे आता शासनाकडून कोणताही लॉकडाऊन करण्यात येणार नाही. ज्याला बंद ठेवायचे त्यांनी ठेवावे आमची कोणतीही हरकत नाही. परंतु अत्यावश्यक सेवा बाधित होता कामा नये. तसेच बंदसाठी कोणाला दादागिरी करता येणार नाही. वेळेबाबत संघटनांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
छगन भुजबळ , पालकमंत्री

- Advertisement -
दोन महीने निर्बंध कायम

आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर वेळेबाबत संघटनांनी आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले त्यानूसार आम्ही विचार विनिमय करून दुकानांसाठी १० ते ५ ची वेळ निर्धारित केली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे करतांना नागरिकांना त्रास होउ नये याकरीता दुकाने या वेळेत सुरू ठेवण्यात येतील. किमान दोन महीने तरी हे निर्बंध पाळण्यात येतील.
संतोष मंडलेचा,
अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -