घरCORONA UPDATEनोकरीची संधी: ३० हजार मानधनावर कोव्हिड योध्दा म्हणून काम करता येणार!

नोकरीची संधी: ३० हजार मानधनावर कोव्हिड योध्दा म्हणून काम करता येणार!

Subscribe

मुंबईत कोरोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. आता बृगन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोव्हिड उपचार केंद्र तसेच विविध रूग्णालय येथे पपॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पंद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वार भरती होत आहे.

वयोमर्यादा –१८ ते ५० वर्षे.

- Advertisement -

वेतन – सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. ३० हजार  प्रतीमहिना.

रिक्त पदे २०३

- Advertisement -

१. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५१ पदं, पात्रता – बी.एस्सी + डीएमएल्टी उत्तीर्ण किंवा १२ वी+ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण

२. क्ष – किरण तंत्रज्ञ – ५२ पदे. पात्रता – १२ वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी उन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी. एस्सी + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव किंवा १२ वी + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव.

३. ई.सी.जी. तंत्रज्ञ – ३९ पदे. पात्रता – १२ वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील ३ १/२ वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.

४. औषध निर्माता – ६१ पदे. पात्रता – डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.)

निवड पद्धती – उमेदवारांनी अंतिम वर्षाच्या पदवी/पदविका परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार निवड केली जाईल.

https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत उपलब्ध आहे.


हे ही वाचा – N95 मास्क कोरोना रोखण्यात अयशस्वी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -