घरCORONA UPDATEसरकारने घेतला निर्णय, आता ३१ डिसेंबरपर्यंत करा Work From Home!

सरकारने घेतला निर्णय, आता ३१ डिसेंबरपर्यंत करा Work From Home!

Subscribe

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा सरकारने मंगळवारी रात्री केली. या घोषणेनुसार आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरूनच काम करता येणार आहे. वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलै संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे.

या घोषणेनुसार आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुनच काम करता येणार आहे. वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलै रोजी संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे. यासंदर्भातील माहिती दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्विटवरुन दिली आहे.

- Advertisement -

३१ जुलैपर्यंत होती मुदत

सध्या ८५ टक्के कर्मचारी हे घरूनच काम करत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसंदर्भातील कर्मचारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करत आहेत. या आधीही दूरसंचार विभागाने ३० एप्रिलला वर्क फ्रॉम होमची मुदत संपण्या आधीच ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान ही घोषणा केली होती.

१३ मार्चला सरकारने आयटी कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. हा कालावधी आधी ३० एप्रिल आणि त्यानंतर ३१ जुलै रोजी संपणार होता. मात्र आता तो थेट ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Lockdown Effect: Linkedin ने घेतला कपातीचा निर्णय, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -