घरCORONA UPDATEधक्कादायक! Love Marriage मोडण्यासाठी मुलीला ठरवलं पॉझिटिव्ह

धक्कादायक! Love Marriage मोडण्यासाठी मुलीला ठरवलं पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील एक आगळीवेगळी लव्हस्टोरी समोर आली आहे. इथे मुलीच्या घरातील मंडळींना मुलगा पसंत नाही. मुलगी मात्र हट्टाला आली असून लग्न करण्यासाठी कोर्टापर्यंत केली. तर कुटुंबियांनीही लग्न मोडण्यासाठी कोर्टाची पायरी चढली. इतकेच नव्हे तर मुलीचे लग्न मोडता यावे याकरता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बतावणी घराच्यांनी केली. असे सांगून मुलीला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. यावर मुलीनेही कोरोना हरणार आणि प्रेम जिंकणार असले म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील अमलपुरा परिसरात १९ वर्षिय मुलीचे आपल्याच समाजातील मुलासोबत प्रेमसूत जुळले. मुलाच्या कुटुंबियांना मुलगी पसंत आहे. मात्र मुलीच्या घरच्यांना मुलगा पसंत नाही. मुलीने घरच्यांची समजूत काढण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र त्यांनी मत बदलले नाही. अशात प्रेमीयुगुलांनी जिल्हा सत्र न्यायालयात लव्ह मॅरेजसाठी अर्ज करण्याचे ठरवले. ते दोघेही अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले असता मुलीच्या घरच्यांनी कोर्टात जाऊन गोंधळ घातला. ते म्हणाले की, वकिलसाहेब तुम्ही या मुलीपासून दूर रहा, हिला कोरोना आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रं. १०४ वर संपर्क केला. एक कोरोना पॉझिटिव्ह मुलगी कोर्टात लग्नाचा अर्ज देण्यासाठी आली असल्याची तक्रार त्यांनी केली.

- Advertisement -

या घटनेमुळे मुलीला आधी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तिच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बतावणीमुळे त्यांचे लग्न आता लांबणीवर गेले आहे. दरम्यान, त्या मुलीला आरोग्य विभागाने जिल्हा हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी नेले असून तिला १४ दिवसांकरता क्वारंटाईनही करण्यात आले आहे.

हेही वाचा –

मुंबईत आणीबाणी वैद्यकीय सुविधेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ३ वाहनांचे लोकार्पण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -