घरताज्या घडामोडीआजीच्या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी केलं कौतुक...

आजीच्या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी केलं कौतुक…

Subscribe

लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून पोटाची खळगी भरणाऱ्या आजीचे पुण्याच्या आयुक्तांनी कौतुक केले आहे.

लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून पोटाची खळगी भरणाऱ्या आजीच्या व्हिडीओने भल्याभल्यांना अचंबित केले आहे. त्यांच्या टॅलेंटने आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. शांताबाई पवार (८५) असे त्यांचे नाव असून त्यांनी वयाच्या ८ वर्षापासून ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी देखील कौतुक केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले पुण्याचे आयुक्त?

पुण्याचे पोलीस आयुक्तांनी आजीबाईंचा व्हिडीओ ट्विट करत ‘टॅलेंट ला कोणत्याही सीमा नसतात’, असे म्हणतं त्यांनी ट्विट केले आहे.

वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.

- Advertisement -

उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले. कोरोनाची भीती होती. मात्र, फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असे आजीने सांगतले आहे.


हेही वाचा – पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करणाऱ्या आजीला रितेशची मदत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -