घरमहाराष्ट्रदिलासादायक! कोल्हापूरात अडीच महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

दिलासादायक! कोल्हापूरात अडीच महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

Subscribe

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एका अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना दिवसेंदिवस देशासह राज्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीत कोल्हापूरमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एका अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि बाळाला पन्हाळा येथील एकलव्य कोरोना काळजी सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सेंटरमधून त्यांच्यासह ९ जणांचे टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील ३५ वर्षाचा तरुण गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेला होता. तेथेच त्यांच्या बाळाचा जन्म झाला.

- Advertisement -

दिनांक १६ जुलै रोजी ते सुरतहून आपल्या पत्नी आणि सासूसह कोल्हापूरमध्ये आले होते. किणी तपासणी नाक्यावरून त्यांना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोविड सेंटर इथं पाठवण्यात आले होते. दिनांक १७ जुलै रोजी या चौघांची कोरोना चाचाणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी चौघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या चौघांना सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

केंद्रातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी असे सांगितले की, प्रोटोकॉल नुसार, केंद्रातील बाधितांवर उपचार करण्यात आले. या केंद्रातून आज एकूण ९ कोरोनामुक्तांना डिस्चार्ज कार्ड देवून टाळ्या वाजवून निरोप देण्यात आले. तर बाळाच्या पालकांनी यावेळी असे सांगितले की, सुरुवातीला बाळाची खूप काळजी वाटत होती मात्र योग्य काळजी घेतल्याने बाळाने जिद्दीने कोरोनाला हरवलं.


आता घरातही मास्क वापरणे बंधनकार, अन्यथा होणार दंड!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -