घरदेश-विदेशGoogle ची कठोर कारवाई; २५०० हून अधिक चिनी यूट्यूब चॅनेल केले Delete!

Google ची कठोर कारवाई; २५०० हून अधिक चिनी यूट्यूब चॅनेल केले Delete!

Subscribe

चीनशी संबंधित Influence Operations साठी सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत अशी कारवाई करण्यात आल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीमुळे जगभर चीनविरूद्ध वातावरण निर्माण झाले आहे. तर लडाखमध्ये हिंसक संघर्षानंतर भारताने चीनविरूद्ध कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. प्रथम भारताने चीनमधील ५९ अॅपवर बंदी घातली. त्यानंतर पुन्हा ४७ अॅपवर बंदी घालण्यात आली. आता गुगलनेही चीनविरूद्ध मोठे पाऊल उचलले आहे. गुगलने चीनमधील २५०० हून अधिक यूट्यूब चॅनल (Chinese YouTube channels) डिलीट केले आहेत.

असे सांगितले जात आहे की, या चीनी युट्यूब वाहिन्यांवरून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. ही माहिती मिळाल्यावर व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने ही चिनी युट्यूब चॅनेल्स काढून टाकली आहेत. गुगलने म्हटले आहे की एप्रिल ते जून या काळात यूट्यूब चॅनेल्स यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले आहेत. चीनशी संबंधित Influence Operations साठी सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत अशी कारवाई करण्यात आल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

- Advertisement -

आपल्या दिशाभूल करणार्‍या माहितीसाठी चालणार्‍या ऑपरेशनच्या बुलेटिनमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. असे सांगितले गेले आहे की, यूट्यूबच्या मते, सामान्यत: स्पॅमी, राजकीय नसलेली माहिती या चॅनेलवर पोस्ट केली जात होती, परंतु त्यांच्यात काही राजकीय समस्यादेखील आहेत. दरम्यान गुगलने या वाहिन्यांची नावे जाहीर केली नाहीत, परंतु अन्य काही माहिती दिली आहे. ट्विटरवर अशाच प्रकारची माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक पाहिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एप्रिलमध्ये डिसिफॉर्मेशन मोहिमेतील (Disinformation Campaign) सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने हा प्रकार ओळखला होता. अमेरिकेच्या चिनी दूतावासाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. यापूर्वी, दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती पसरवण्याशी संबंधित सर्व आरोप चीनने पूर्णपणे नाकारले आहेत.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -