घरताज्या घडामोडीVideo: 'अंगभर चिखल लावा, रोग प्रतिकारकशक्ती वाढवा'

Video: ‘अंगभर चिखल लावा, रोग प्रतिकारकशक्ती वाढवा’

Subscribe

भाजपचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांनी कोरोना संबंधित अजब दावा केला आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. एकीकडे वैज्ञानिक आणि संशोधक २४ तास काम करत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते कोरोना संबंधित लोकांना अजब उपाय सांगत आहेत. ‘अंगभर चिखल लावा, रोगप्रतिकारकशक्ती वाढवा’, असा अजब उपाय भाजपचे खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांनी सांगितला आहे.

भाजपचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांनी असा दावा केला आहे की, ‘चिखलात बसून अंगभर चिखल लावा आणि शंख वाजवा. यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.’ यासंबंधित व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये स्वतः सुखबीर सिंग जौनापुरिया चिखलात बसून कोरोनावरील हा अजब उपाय सांगत आहेत. याआधी त्यांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिननिमित्ताने शरीराला चिखल लावत योगा केला होता.

- Advertisement -

गेल्या महिन्यात संसदीय कार्यमंत्री आणि बिकानेरेचे भाजप खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी देखील कोरोना संबंधित अजब दावा केला होता. भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील. तसेच हे पापड कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील, असा कोरोनावर उपाय अर्जुन राम मेघवाल सांगितला होता. यापूर्वी पण पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी देखील अजब उपाय सांगून ते चर्चेत आले होते. त्यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या असा सल्ला दिला होता. या कोरोनाच्या काळात भाजपचे नेते अनेक अजब दावे करून चर्चेत येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: रशियापूर्वी आम्ही तयार केली कोरोनाची लस – चीनचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -