घरताज्या घडामोडीMahad building collapse Live Updates : महाड इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू

Mahad building collapse Live Updates : महाड इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू

Subscribe

महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून १० वर पोहोचला आहे. दरम्यान, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

१)सय्यद अमित समीर, वय ४५

- Advertisement -

२) नविद झमाने, वय ३५

३) नाैसिन नदीम बांगी, वय ३०

- Advertisement -

४) आदी हाशिम शैकनग, वय १६

५) अनाेळखी स्री चा मृतदेह

६) रोशनबी देशमुख, वय ५६

७) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२

८) फातिमा अन्सारी, वय ४०

९) अल्लतिमस बल्लारी, वय 27

१०) शौकत आदम अलसूलकर, वय ५०


महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला असून आता तो ८ वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या पथकाने आणखी एक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला.

१)सय्यद अमित समीर, वय ४५

२) नविद झमाने, वय ३५

३) नाैसिन नदीम बांगी, वय ३०

४) आदी हाशिम शैकनग, वय १६

५) अनाेळखी स्री चा मृतदेह

६) रोशनबी देशमुख, वय ५६

७) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२

८) फातिमा अन्सारी, वय ४०


महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातवर पोहोचला असून अद्याप त्यांचे तपशील मिळालेले नाही.

ani tweet

या दुर्घटनेत सय्यद अमित समीर (वय ४५), नविद झमाले (वय ३५), नौसिन नदिम बांगी (वय २०) आणि हाशिम शैकनग (वय १६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


रायगड जिल्ह्यातील महाड येथे पाच मजली इमारत संपूर्णपणे ढासळल्याचे समजताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमवेत मदतकार्याबाबत समन्वय साधून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना जलदगतीने बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ लावण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची आपत्कालीन मदत पथक (टीडीआरएफ) आणि अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनीही मदतकार्याला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.

 


चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले.

मोहम्मद बांगी

दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली. या ठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.


Mahad Building Collapse : ढिगाऱ्याखालून ७८ जणांना सुखरूप बाहेर काढले; १९ जणांचा शोध सुरू

महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत काल, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, १ जिम, १ मोकळा हॉल होता. ए विंगमध्ये एकूण २१ सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करत असलेल्या व्यक्तींची संख्या ५४ हाेती. सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ४१ असून अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या १३ आहे. बी विंग मध्ये २० सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या ४३ हाेती. या दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ३७ आहे. अद्यापही इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची संख्या ६ आहे. (सविस्तर वाचा)


Mahad Building Collapse : बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल – पालकमंत्री आदिती तटकरे

महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवार, २४ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. (सविस्तर वाचा)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाड दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत त्यातील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे. तसेच जखमी झालेले लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महाड दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करणारे ट्विट केले आहे.


खासदार सुप्रीया सुळे यांनी ट्विट करत महाड दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.


राज्यमंत्री उदय सामंत यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडमधील इमारत दुर्घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याबाबत एनडीआरएफच्या महासंचालकांशी बातचीत केली आहे. सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.


या इमारतीत एकूण ९४ रहिवासी राहत होते. त्यापैकी ७५ जण सुरक्षित असून अजूनही १९ ते २० रहिवासी अडकले आहेत. या दुर्घटनेत समीर सय्यद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये बिल्डर, वास्तुविशारद, आरसीसी सल्लागार, मुख्याधिकारी आणि इंजिनीअर यांचा समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा बिल्डर पसार झाला असून ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल,  अशी माहिती स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.


रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला असून आणखी १८ जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता आहे.


रायगड जिल्ह्यात महाड येथे काल, सोमवारी सायंकाळी इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनानेही युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. या ठिकाणी आठ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून आतापर्यंत ७ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे.


रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. येथे तीन एनडीआरएफची टीम दाखल झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. तर जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत. काहींना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती यावेळी अदिती तटकरे यांनी दिली. दरम्यान, रात्री उशीर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.


शहरातील काजळपुरा विभागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. सन २०११ मध्ये पनवेलच्या कोहिनूर डेव्हलपरने या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीच्या दोन विंगमध्ये एकूण ४७ सदनिका असून, राहणार्‍यांची संख्या २०० पर्यंत आहे. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -