घरटेक-वेकट्रायच्या नोटीसमुळे Vodafone Idea चे लोकप्रिय प्लॅन बंद होण्याची शक्यता

ट्रायच्या नोटीसमुळे Vodafone Idea चे लोकप्रिय प्लॅन बंद होण्याची शक्यता

Subscribe

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय – TRAI) दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला (Vodafone Idea) नोटीस बजावली आहे. नियमांच्या उल्लंघनामुळे ट्रायने व्होडाफोन आयडियाला नोटीस बजावली आहे आणि रेडएक्सची टॅरिफ प्लॅन ( RedX tariff plan) बंद करण्यास सांगितले आहे. व्होडाफोन आयडियाला ट्रायच्या नोटीसचे उत्तर ३१ ऑगस्टपर्यंत द्यावे लागणार आहे.

प्रकरण काय आहे?

व्होडाफोन आयडियाने आपल्या रेडएक्स टॅरिफ प्लॅनमध्ये वेगवान इंटरनेट स्पीड देण्याचा दावा केला आहे. ज्याला ट्रायने ग्राहकांना आमिष दाखवण्याचा आणि खोटे वचन दिल्याचा करार केला आहे. ट्रायच्या मते रेडएक्स टॅरिफ प्लॅनमध्ये पारदर्शकता नाही. ट्रायने व्होडाफोन आयडियाला पाठविलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ग्राहकांना वेगवान डाटा प्राथमिक तत्वावर फास्ट ४जी नेटवर्क उपलब्ध करण्याचा दावा रेग्यूलेरी फ्रेमवर्कच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत कंपनीची रेडएक्स टॅरिफ ऑफर टेलीकॉम टॅरिफ ऑर्डर १९९९ चा उल्लंघन करते. ट्रायच्या वतीने असे म्हटले गेले होते की, रेडएक्स टॅरिफ ऑफर युजर्सच्या हिताचे रक्षण करण्याशी संबंधित टेलिकॉम टॅरिफ ऑर्डर कलमांची पूर्तता करीत नाही. तसेच ही ऑफर परवाना कराराच्या अटींचे उल्लंघन करते.

- Advertisement -

व्होडाफोन आयडीया आणि एअरटेलची तपासणी करण्यात आली

ट्रायने गेल्या अनेक आठवड्यांपासून व्होडाफोन आयडियाच्या रेडएक्स प्लॅन आणि भारती एअरटेलच्या प्लॅटिनम ऑफरची तपासणी करीत आहे. ट्रायने आपल्या तपासणीमध्ये टेलीकॉम प्रोव्हाइडरकडून जाब विचारला आहे. प्रकरणामध्ये व्होडाफोनने आपल्या रेडएक्स टॅरिफ रिचार्ज प्लॅनचे औचित्य सिद्ध केले. ज्यानंतर मात्र ट्रायच्या वतीने भारती एअरटेलला कारणे दाखवण्याची नोटीस बजावण्यात आलेली नाही आणि भारतीय एअरटेलविरुद्धचा तपास देखील पुढे गेला नाही.


हेही वाचा –  Realme कंपनी लवकरच Narzo सीरिजचे दोन बजेट फोन लाँच करणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -