घरताज्या घडामोडीकाकूंच्या १८०० रुपयांच्या व्हिडीओवर मंत्री यशोमती ठाकूर म्हणतात...

काकूंच्या १८०० रुपयांच्या व्हिडीओवर मंत्री यशोमती ठाकूर म्हणतात…

Subscribe

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेतली असून हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत.

सोशल मीडियावर कोणती गोष्ट केव्हा व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका घरगुती काम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन मजेशीर कॅप्शन देखील देत आहेत. तर या व्हिडीओचे मीम्स देखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडीओवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहित या प्रकणावर त्यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

‘घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत’.

- Advertisement -

काय आहे व्हिडीओत?

या व्हिडीओमध्ये एक महिला काही तरुणांना तिच्या कामाचे १८०० रुपये मागत आहे. सदर तरुण महिलेला १८०० रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहेत. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार नाही. या तरुणांनी महिलेला ५०० च्या तीन, २०० ची एक आणि १०० ची एक असे १८०० रुपये दिल्याचे सांगत आहेत. तसेच महिला सुद्धा हे मान्य करत आहे. ती म्हणते की तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे अठराशे रुपये हवे आहे. त्यावर त्या तरुणांना काय करावे हे कळत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; रस्त्यावरुन चालणाऱ्या सहा जणांना टँकरने उडवले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -