घरताज्या घडामोडी'शहीद शिरीषकुमार' यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘शहीद शिरीषकुमार’ यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

देशासाठी अनेक स्वातंत्र्यविरांनी त्यांचा प्राण गमावला आहे. याच स्वातंत्र्यविरांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशाला ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांचा सहभाग होता. त्यातलेच एक नाव म्हणजे ‘शहीद शिरीषकुमार’. लवकरच ‘शहीद शिरीषकुमार’ यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे.

शिरीषकुमार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नंदुरबार येथे ‘शहीद शिरीषकुमार स्मारक’ येथे या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘शहीद शिरीषकुमार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन भावेश पाटील करत असून निर्मिती माधुरी वडाळकर करत आहेत.

- Advertisement -

१९४२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरोधात ‘भारत छोडो’ आंदोलन केले. या आंदोलनात लहानथोरांपासून अनेक जण सहभागी झाले होते. यामध्ये नंदुरबारमधील १५ वर्षीय ‘शिरीषकुमार मेहता’ सरकारच्या विरोधात मोर्चाचे नेतृत्व करत होते. यावेळेस बालक्रांतिकारक ‘शिरीषकुमार मेहता’ यांना हौताम्य आले. त्यामुळेच त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणार ‘शहीद शिरीषकुमार’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आजच्या पिढीला आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या देशभक्ताच्या समर्पणाची आठवण करून देण्यासाठी ‘शहीद शिरीषकुमार’ चित्रपटाची धुरा हाती घेतल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -